हाथरस  पिडीताचे रिपोस्टमाॅर्टम टाळण्यासाठी पोलीसांनी केले अंत्यसंस्कार- प्रा.मुकुंद खैरे

विवेक मेतकर
Friday, 2 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत समाजाच्या मुलीवर पाशवी बलत्कार आणि अंगावर गंभीर जखमा अनेक ठिकाणी फॅक्चर करणार्या नरधाम आरोपींना बलत्काराच्या गुन्हातुन वाचविण्यासाठी पोलिसांनी नातेवाईकांकडे मुलीचा मृतदेह न देता जोरजबरजस्तीने पिडीताचे रिपोस्टमाॅर्टम टाळण्यासाठी अग्नी संस्कार केला.

अकोला: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत समाजाच्या मुलीवर पाशवी बलत्कार आणि अंगावर गंभीर जखमा अनेक ठिकाणी फॅक्चर करणार्या नरधाम आरोपींना बलत्काराच्या गुन्हातुन वाचविण्यासाठी पोलिसांनी नातेवाईकांकडे मुलीचा मृतदेह न देता जोरजबरजस्तीने पिडीताचे रिपोस्टमाॅर्टम टाळण्यासाठी अग्नी संस्कार केला, अशि प्रतीक्रिया समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकुंद खैरे यांनी व्यक्त केली.

प्रा. खैरे पुढे म्हणाले की पिडीत मुलीचा सुरवातीला पोलीसांनी रिपोर्ट घेतला नव्हता यावरुन पोलीस व सरकारची भूमिका आरोपींना वाचविणारी आहे.आता पोलीसांचे म्हणने आहे की पिडीत मुलीवर बलत्कार झालाच नाही.पिडित मुलीचा मृतदेह दफन केला असता तर पोस्टमाॅर्टम ची मागणी सामोर आली असती.

आणि बलत्कार सिद्ध झाला असता तर आरोपींना फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला असता आता पिडीत मुलीचा निर्घुण पणे खुन झाला.मग पुरावे महत्त्वाचे ठरतात आणि पुरावे मिळाले नाही तर असे बलत्कारी सुटु शकतात.

एकंदरीत उत्तर प्रदेश मध्ये कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली असून राज्यात गुंडाराज्य निर्मान झाले आहे. असे मत प्रा.खैरे यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Police conducted cremation to prevent re-postmortem of Hathras victim