पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

सुगत खाडे  
Tuesday, 22 September 2020

राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अकोला : राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढतच असून, त्यामुळे पोलिस दलासह त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अकोल्यातील कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अकोलेकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसांवर कोरोनाचे संकट गडद होत असून, केवळ अकोलेकरांच्या निष्काळजीमुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही धोक्याचे सावट आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आर.पी.टी.एस.अकोला येथे कार्यरत पोलिस हेडकाँस्टेबल राजू नथ्थूजी खेडकर यांचे कोरोना विषाणू कोविड-१९ मुळे सोमवारी (ता.२१) निधन झाले. त्यांच्यावर १३ सप्टेंबरपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार सुरू होते.

राजू खेडकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतरी त्यांना जीएमसीमध्ये ता. १३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर आईसीयूमध्ये उपचार केले जात होते. सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहली. राजू खेडकर यांना एक मुलगा आहे. त्यांनी पीटीएस, सिटी कोतवाली, पोलिस मुख्यालय काम केले आहे.

 विनाकारण रस्त्यावर फिरणारे हे कोरोनाचे वाहक ठरू शकतात. पर्यायाने पोलिसांनाही कोरोनाचा धोका निर्माण करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Policeman dies due to corona