esakal | मातीतूनच उगवले फितुरांचे पिक, सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Politics of Washim Bazar Samiti

शेती आणि शेतकरी राजकारण्यांचा कायम चर्चेचा विषय असतो. सत्तेत असले तरीही कळवळा दाखवायचा विरोधात असले तर आम्हीच शेतकर्यांचे तारणहार असा गळा काढायचा. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत मात्र सगळ्याच राजकारण्यांनी बाजार समितीची वाट लावण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नसून भुमाफियाने फेकलेल्या तुकड्यासाठी गेल्या पंधरा वर्षात स्वतःला शेतकर्यांची पोरं म्हणूवून घेणारे फितुर निपजले आहेत. तब्बल अडीच एकर जागा शेतकऱ्यांसाठी वापरण्या ऐवजी भुमाफियासमोर कोण जास्त फितुरी करतो यातच धन्यता मानत आहेत.

मातीतूनच उगवले फितुरांचे पिक, सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी

sakal_logo
By
राम चौधरी

वाशीम :  शेती आणि शेतकरी राजकारण्यांचा कायम चर्चेचा विषय असतो. सत्तेत असले तरीही कळवळा दाखवायचा विरोधात असले तर आम्हीच शेतकर्यांचे तारणहार असा गळा काढायचा. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत मात्र सगळ्याच राजकारण्यांनी बाजार समितीची वाट लावण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नसून भुमाफियाने फेकलेल्या तुकड्यासाठी गेल्या पंधरा वर्षात स्वतःला शेतकर्यांची पोरं म्हणूवून घेणारे फितुर निपजले आहेत. तब्बल अडीच एकर जागा शेतकऱ्यांसाठी वापरण्या ऐवजी भुमाफियासमोर कोण जास्त फितुरी करतो यातच धन्यता मानत आहेत.


कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्यांची संस्था आहे. आधारभूत किमतीसोबत खुल्या बाजारातील स्पर्धेत सुरक्षितता मिळवून देण्याचे काम बाजार समितीने केले आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षात वाशीम येथील बाजार समिती राजकारण्यासाठी खुले कुरण ठरले आहे. याबाबत विभागिय उपनिबंधकाच्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

या अहवालानुसार कोट्यावधी रुपयांच्या वसूलीच्या नोटीसीला उत्तर देण्याची पाळी बाजार समितीच्या आजी माजी प्रशासक व संचालकांवर आली आहे. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेली ही फितुरांची टोळी अजूनही बधली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.शेतकर्यांच्या मालकीची मात्र जिनिंग व प्रेसिंग ला भाडेपट्ट्यावर दिलेली जागा भुमाफियाला कशी मिळेल यासाठी माजी संचालक मंडळ, प्रशासक मंडळ व विद्यमान प्रशासक मंडळ जिवाचा आटापिटा करीत असल्याचे चित्र आहे.

मागील संचालक मंडळाने या जागेची ठराव घेवून विल्हेवाट लावण्याची चोख तजविज केल्यानंतर आताच्या प्रशासक मंडळाने तर या जागेचे आरक्षण बदलण्याचा घाट घातला आहे. या द्रविडी प्राणायामासाठी भुमाफियायाकडून रसद पुरविण्यात आल्याची चर्चा आहे. ही मोक्याची जागा शेतकर्यांजवळ रहावी असा एकाही तथाकथीत भूमिपुत्राच्या मनात विचार येवू नये हे शेतकर्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. या जागेची विल्हेवाट लावल्यानंतर हेच कारभारी पुन्हा शेतकर्यांची लेकर म्हणवून घेणार आहेत.

अनाकलनीय राजकारण
सध्या बाजार समितीच्या प्रशासक मंडळामधे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काॅग्रेसचा समावेश आहे. या पक्षाचे पुढारी स्वतःला शेतकर्यांची लेकरं म्हणवून घेतात याआधी भाजपचे प्रशासक मंडळ होते मात्र जागेच्या व भुमाफियाला जागा देण्याच्या कामात सगळे एकाच माळेचे मणी ठरले आहेत. एरवी एकमेकांची उणीदुणी काढण्यात व कार्यकर्त्यांना एकमेकांच्या विरोधात कार्यकर्त्यांना झुंजविण्यात धन्यता माननारे नेते किती बेगडी आहेत हे यावरून सिद्ध झाले आहे.


सगळ्यांचा बुरखा फाडणार...भोयर
सध्याच्या प्रशासक मंडळाने बाजार समितीच्या मुळ मालकीची असलेली जागा भुमाफियाला देण्यासाठी या जागेचे आरक्षण बदलण्याचा घाट घातला आहे. ही जागा शेतकर्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड मोठे आंदोलन छेडणार आहे.शेतकरी कष्टकरी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारांचा आम्ही अभिनव आंदोलनाव्दारे बुरखा फाडणार आहोत.
- गजानन भोयर, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

(संपादन - विवेक मेतकर)