esakal | ‘जीएमसी’च्या कामकाजाचे पोस्टमार्टम!, आमदार सावरकर यांनी केली कानउघडणी
sakal

बोलून बातमी शोधा

akola news Postmortem of GMC's work !, MLA Savarkar inaugurated

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात रूग्णांना सूमार दर्जाच्या सुविधा मिळत आहेत. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळत असल्याने सोमवारी (ता. ५) आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी जीएमसीच्या कामकाजाचे पोस्टमार्टम केले.

‘जीएमसी’च्या कामकाजाचे पोस्टमार्टम!, आमदार सावरकर यांनी केली कानउघडणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालयात रूग्णांना सूमार दर्जाच्या सुविधा मिळत आहेत. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी मिळत असल्याने सोमवारी (ता. ५) आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी जीएमसीच्या कामकाजाचे पोस्टमार्टम केले. रूग्णांना योग्य दर्जाच्या सुविधा न मिळाल्यास व कारभागात सुधारणा करा, असा दम यावेळी भाजप आमदारांनी रूग्णालय प्रशासनाला भरला.

स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) कोविड व नॉन कोविड रूग्णांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यामुळे याविषयी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सोमवारी (ता. ५) भाजप आमदारांसह पदाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक दिली. यावेळी रुग्णालयात भरती कोविड रूग्णांना सहा महिन्यांपासून सकस आहार व अंडे का देण्यात येत नाहीत? रुग्णालयात अस्वच्छता असल्याने रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंत्राटी कामगारांना त्यांच्या कामाचा पूर्ण मोबदला तसेच नॉन कोविड रूग्णांच्या नावाने लाखो रुपयांची विम्याची रक्कम काढण्यात आली, रूग्णालयात कार्यरत बीएएमएस डॉक्टरांना वेतन वेळेवर का देण्यात येत नाही, या विषयांवर भाजप आमदारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये व इतरांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी कामकाजात सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले. रूग्णालयातील बंद असलेली डायलीसीस मशीन आठ दिवसात सुरू करा, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. यावेळी भाजपचे आमदार रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, भाजप महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर
अर्चना मसने, वसंत बाछुका, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. कुसुमाग्रज घोरपडे, डॉ. दिलीप सराटे, डॉ. अर्चना वाहने, डॉ. अरविंद डहाळे, डॉ.पि से, डॉ. नेताम, जयंत मसने व इतरांची उपस्थिती होती.
------------------
पळसपगार कुटुंबाला मदत द्या!
वणी वारुळा येथील रोषण निरंजन पळसपगार या १९ वर्षीय युवकाला अकोट येथून अकोला येथे १०८ रुग्णवाहीकेने आणत असताना गाडीचे टायर पंक्चर झाले. गाडीत स्टेपनी नसल्याने अडीच तास उपचार होऊ शकला नाही. त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बाबत जबाबदारी निश्चित करावी तसेच संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व पळसपगार कुटुंबाला भरीव आर्थिक मदत शासनाने करावी, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.
----------------
मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना केला फोन
सर्वोपचार रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन संदर्भात शासन मदत करत नसेल तर आमदार निधी किंवा जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्य पूर्ण निधीतून नवीन मशीन उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी भाजप आमदारांनी केली. त्यासाठी मनुष्यबळा संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांची खासगी सचिव विकास खारगे यांचेसोबत संपर्क साधण्यात आला. तसेच रोटरी व लायन्स क्लब सुद्धा या संदर्भात मदत करणार असल्याचे यावेळी
सांगण्यात आले. खासगी रुग्णालयाच्या सहाय्याने शहरात २० लाख रुपयांपर्यंत कोविडच्या नावावर बनावट विम्याचे पैसे उखळण्यात आले, त्याच्या चौकशी समितीच्या अहवालाचे काय झाले? त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image