बापरे! दारूसाठी पैसे नाही म्हणताच डोक्यात घातली कुऱ्हाड

मुशीरखान कोटकर
Monday, 7 September 2020

दारूसाठी पैसे मागितल्यानंतर नकार देताच डोक्यावर कुऱ्हाड घालून प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी एका वृद्धाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा नोंदविला आहे

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) :  दारूसाठी पैसे मागितल्यानंतर नकार देताच डोक्यावर कुऱ्हाड घालून प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी एका वृद्धाविरुद्ध पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा नोंदविला आहे

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील पिंपळनेर येथील विठ्ठल आटोळे यांना त्यांच्या घरा नजीक राहत असलेल्या किशोर अंभोरे याने दारू पिण्यासाठी शंभर रुपये मागितले. त्यांनी नकार दिला. यावेळी किशोरने रागाच्या भरात विठ्ठल यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सदर हल्ल्यात विठ्ठल आटोळे गंभीर जखमी झाले. त्यांना जालना येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात जखमी विठ्ठल आटोळे यांचा भाऊ पांडुरंग भिमराव आटोळे (वय ३१) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी किशोर शामराव अंभोरे याच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करून प्राणघातक हल्ला करीत जखमी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ता. ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल श्री गवई तपास करीत आहे. जखमी विठ्ठल आटोळे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News put an ax to his head saying no money for liquor

Tags
टॉपिकस