
तालुक्यातील आधारभूत किमंत व्दारे कापूस खरेदी व्हावी यासाठी एक हजार शेतकऱ्यांने बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. तेव्हा येथे कापूस खरेदी सुरू होते की, नाही याकडे लक्ष ठेऊन बसलेले नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
मानोरा (जि.वाशीम) ः तालुक्यातील आधारभूत किमंत व्दारे कापूस खरेदी व्हावी यासाठी एक हजार शेतकऱ्यांने बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. तेव्हा येथे कापूस खरेदी सुरू होते की, नाही याकडे लक्ष ठेऊन बसलेले नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
यासाठी बाजार समितीचे सभापती गोविंद चव्हाण, उपसभापती राजेश नेमाने व संचालकाच्या वतीने नागपूर येथील पणन महासंघाला वारंवार दूरध्वनी वरून विनंती करण्यात आली परंतु, त्यांच्याकडे कर्मचारी नाही असे उत्तर मिळत आहेत? याविषयी पणन महासंघाचे तथा अकोला बाजार समितीचे सभापती शिरीश धोत्रे यांना निवेदन देण्यात आले.
बाजार समिती एवढाच न थांबता वाशीम जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधला परंतु, काहीच होत नसल्याने शेतकऱ्यांना अजून प्रतिक्षाच करावी लागणार आहे. येथे पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होणार या आशेवर एक हजार शेतकऱ्यांने बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. परंतु, अद्याप पावतो पणन महासंघाची खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कापूस खरेदी केव्हा सुरू होणार या संदर्भात शेतकरी बाजार समितीला विचारणा करत आहे. परंतु, पणन महासंघाची कोणत्याही प्रकारचे आदेश येत नाहीत. बाजार समितीच्या वतीने शिरीष धोत्रे संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाडे, पणन महासंचालक नागपूर यांच्याकडे दिले आहेत. या संदर्भात आमदार राजेंद्र पाटणी यांनी पणण सचिवांना पत्रही दिले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)