अकोल्याचे संजय नाठक एअर मार्शलपदी पदोन्नती

विवेक मेतकर
Thursday, 15 October 2020

येथील भूमिपुत्र संजय नाठक यांना भारतीय संरक्षण मंत्रालयात एअर मार्शल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांनी वायुदलात बंगळुरु, शिलाँग व अन्य भागात त्यांनी सेवा दिली आहे.

अकोला  ः येथील भूमिपुत्र संजय नाठक यांना भारतीय संरक्षण मंत्रालयात एअर मार्शल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांनी वायुदलात बंगळुरु, शिलाँग व अन्य भागात त्यांनी सेवा दिली आहे.

शहरातील लरातो वाणिज्य महाविद्यालयातील माजी प्रा. भाऊ नाठक यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांच्या नियुक्तीचा अकोल्यात आनंद व्यक्त करण्यात आला.

भारतीय हवाई दलाच्या प्रशासकीय विभागाकडे मनुष्यबळाशी संबंधित आणि इमारतींची नवीन बांधकामे, दुरुस्ती व तत्सम स्वरूपाच्या कामांची जबाबदारी असते. या विभागांतर्गत आणखी दोन उपशाखा आहेत. हवाई वाहतूक आणि लढाऊ विमानांचे नियंत्रण. शत्रूच्या विमानावर हल्ला चढविण्यासाठी आपल्या लढाऊ विमानाचे स्थान महत्त्वाचे ठरते.

त्या अनुषंगाने दैनंदिन सरावाद्वारे अभ्यासांती सज्जता राखली जाते. अतिशय महत्त्वपूर्ण अन् विशेष स्वरूपाचे हे काम. त्याचे दायित्व असणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखपदाची जबाबदारी आता, प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या एअर मार्शल संजय नाठक यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Sanjay Nathak of Akola promoted as Air Marshal