पाण्यावरून जलव्यवस्थापन समितीच्या सभेत वादळी चर्चा

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 28 November 2020

जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बुधवारी झालेल्या ऑनलाइन सभेत तेल्हारा तालुक्यातील पाणी प्रश्नावर व वानमधून पाण्याचा पुरवठा करण्यावरून वादळी चर्चा झाली.
 

अकोला : जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बुधवारी झालेल्या ऑनलाइन सभेत तेल्हारा तालुक्यातील पाणी प्रश्नावर व वानमधून पाण्याचा पुरवठा करण्यावरून वादळी चर्चा झाली.

दरवर्षी प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारण्यसाठी उपाय याेजनाही करण्यात येतात. मात्र प्रभावी अंमलबजावणी हाेत नसल्याने ग्रामस्थांपर्यंत पाणी पाेहाेचत नाही.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

असाच काहीसा प्रकार तेल्हारा तालुक्यात उजेडात आला असून, २५ नाेव्हेंबर राेजी जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता सभेत चर्चाही झाली.

सभा जि.प.अध्यक्षा प्रतिभा भाेजने यांच्या अध्यक्षेखाली पार पडलेल्या सभेत वाणच्या पाण्याच्या प्रश्नावरून शिवसेना सदस्यांनी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. सभेला उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड ,महिला व बालकल्याण सभापती मनिषाताई बोर्डे ,समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट ,पशुसंवर्धन व कृषी सभापती पंजाबराव वडाळ ,सदस्य संजय अढाऊ,मोहित उर्फ पप्पू तिडके ,सुषमा सरकटे ,संजय बावणे आदी सदस्य हजर होते.

हेही वाचा - राजकीय पक्षांचे वर्चस्व सिद्ध होणार की शिक्षकांच्या संघटनांचे बळ !

शिवसेनेचे बेलखेड सर्कलचे सदस्य संजय आढाऊ यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत माळेगाव बाजार परिसरातील पाणी पुरठ्याबाबत अभियंत्यांना जाब विचारला. अमरावती जिल्ह्यात ३०० फूट बाेअर करण्याची परवागी असून, अकाेल्यात मात्र ही परवानगी २०० फूटपर्यंतच आहे. हा अन्याय का, अकाेला महाराष्ट्रात नाही काय, अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Stormy discussion on water management committee meeting