
नांदुरा (जि.बुलडाणा) : शेती म्हटले की, नापिकी... कर्जबाजारीपणा... दुष्काळाची झळ... अशा एक ना अनेक अडचणी... कायम पैसाची चणच...आर्थिक अचडणीचा धंदा... त्यामुळे शेती परवडेनाशी झाल्याचा सर्वत्र सूर...या परिस्थितीत नांदुरा तालुक्यातील कंडारी येथील शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी माळरानावरच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतीत ‘सोन’ पिकवलं. त्यांच्या कार्याची दखल घेत शासनानेही त्यांना अनेक पुरस्कार देवून गौरविले आहे.
नांदुरा तालुक्यातील कंडारी गाव. गावाजवळच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कंडारी धरणाचा पायथा. धरण होण्यापूर्वी एक दुष्काळी गाव म्हणून कंडारी गाव ओळखलं जात होतं. धरण १९८७ ला पूर्ण झालं आणि गावातील शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले. सर्व गावातील जमीन ओलिताखाली आली.
गावात लक्ष्मी नांदू लागली. गावाचा काया पालट झाला. त्यापैकीच एक प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब पाटील. बी. एस. सी. द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण. कुटुंबाकडे ४० एकर जमीन.
त्यात सीताफळ, पेरू, चिंचेची बाग फुलवली. त्यातीलच २५ एकर खडकाळ जमिनीवर पेरू, सीताफळाची लागवण केली. सीताफळ, पेरूची झाडं पाच वर्षांची झाली. खडकात हिरवीगार बाग फुलू शकते हे बाळासाहेबांनी केलेल्या परिश्रमातून दिसून आले.
पूर्ण खडकाळ जमीन तीन टप्यात विभागली. पाण्याचे योग्य नियोजन केले. जानेवारीपर्यंत विहारीस पाणी असते. उन्हाळ्यात पाणी आटून जाते. त्यामुळे गावातील शेतातून तीन कि.मी. जलवाहिनी टाकून खडकाळ जमिनीतील विहिरीत आणली आणि उन्हाळ्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवला.
नांदुरा तालुक्यातील पोट येथील रामकृष्ण पाटील यांचे मार्गदर्शन बाळासाहेबांना लाभले. पपई, संत्र्याची बाग, मिरची, हळद, कपाशी, सोयाबीन, झेंडूंची फुलं हे सर्व काही त्यांनी या माळरानावर पिकवलं. शेती म्हणजे निराशा, अपयश म्हणून त्याकडे बघणाऱ्यांसाठी बाळासाहेबांनी खडकात पिकवलेले हे सोनं म्हणजे एक आदर्शच आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.