‘तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका!’, तलाठ्याची शेतकऱ्याला उद्धट वागणूक

सकाळ वृत्तसेेवा
Sunday, 22 November 2020

खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील शेतकऱ्यांना महिला तलाठी किरण गवई यांच्याकडून मिळत असलेली अरेरावीची वागणुकीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी स्वरुपाची तक्रार करून करावाईची मागणी केली आहे.

भालेगाव बाजार (जि.बुलडाणा) ः खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील शेतकऱ्यांना महिला तलाठी किरण गवई यांच्याकडून मिळत असलेली अरेरावीची वागणुकीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी स्वरुपाची तक्रार करून करावाईची मागणी केली आहे.

महसुल विभाग हा शेतकऱ्यांच्या ज्यास्त नीगडीत आहे. त्यामुळे शेतीचे सर्व कामकाज म्हणजे नोंद करणे, फेरफार सातबाऱ्यावर नावं कमी करणे, वाढवने व इतर शासकीय कामे करणे म्हणजे तलाठी शिवाय शेतकऱ्यांचा दिवाच लागता नाही.

तलाठी गावात येत नसल्याने दोन दिवसांआधी अत्रज येथील शेतकरी किसन देशमुख यांनी तलाठ्यांना कामकाजासंबंधी फोन केला असता, जनतेचे सेवक असलेल्या महिला तलाठी किरण गवई यांनी ‘तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका’ अत्रज आले नाही तर तुम्ही मला फाशी देणार का? अशी भाषा वापरत उद्धटपणाची वागणूक दिली.

याप्रकरणी शेतकऱ्याने तहसीलदारांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. मात्र, आजपर्यंत तलाठी गवई यांच्यावर तहसीलदारांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे तहसीलदार तलाठी यांना पाठीशी घालत तर नाहीतना असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.

तलाठी कार्यालय विसरले
शासनाच्या आदेशानुसार तलाठ्यांना संबंधित गावातील कार्यालयात राहणे बंधनकारक असून देखील तलाठी गावकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तलाठ्‍यांना फोन केला असता त्यांच्याकडून शेतकऱ्यांसोबत व्यवस्थित बोलणे देखील तारेवरची कसरत करण्यासारखे होते.

तहसीलदारांची बदली झाली आहे. नवीन तहसीलदार रुजू होताच अत्रज येथील तलाठ्यांची चौकशी करण्यात येईल.
-राजेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी, खामगाव.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Talathi farmers treated rudely, Demand for action from farmers