शिक्षक मतदारसंघ: सर्वच समस्यांना अचानक फुटले तोड, निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रत्येकाचा दावा

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 28 November 2020

अमरावती शिक्षक मतदार संघाच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत प्रचाराने वेग घेतला आहे. शिक्षकांच्या समस्यांना अचानक तोंड फुटल्याने ही प्रचाराची ‘वाफ’ की, समस्येची ‘उकल’ हा प्रश्न शिक्षकांनाच पडला आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार हा शिक्षकच असला पाहिजे, या मतांवर अनेक शिक्षक ठाम आहेत.

वाशीम : अमरावती शिक्षक मतदार संघाच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत प्रचाराने वेग घेतला आहे. शिक्षकांच्या समस्यांना अचानक तोंड फुटल्याने ही प्रचाराची ‘वाफ’ की, समस्येची ‘उकल’ हा प्रश्न शिक्षकांनाच पडला आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार हा शिक्षकच असला पाहिजे, या मतांवर अनेक शिक्षक ठाम आहेत.

अमरावती विभागीय मतदारसंघामध्ये वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती बुलढाणा या जिल्ह्याचा समावेश आहे. यावेळी उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने अजूनही चित्र अस्पष्ट आहे. या मतदार संघात २७ उमेदवार उभे असले तरी, लढत मात्र पंचरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये विमाशि संघ, मराशिप, विभागीय शिक्षक महासंघ, विभागीय शिक्षक संघ, शिक्षक आघाडी, विज्युक्टा अमरावती विभागीय शिक्षक संघ, या संघटनेच्या उमेदवारांमध्येच खरी टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

जिल्हानिहाय मतदान
अमरावती शिक्षक मतदार संघामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील सुमारे ३४ हजार ६९० मतदार आहेत. अमरावती-दहा हजार ८८, अकोला-सहा हजार, बुलढाणा-सात हजार ४२२, वाशीम-तीन हजार ७७३ तर, यवतमाळमध्ये सात हजार ४०७ अशाप्रकारे जिल्हा निहाय मतदान आहे. यावेळीही ही निवडणूक पक्षीय नसल्याचे सांगितले जात असले तरी, ही निवडणूक पक्षीय राजकारणाचाच एक भाग ठरली आहे.

हेही वाचा - बँकांची कामं करायची कशी, संप आणि वीकेंडमुळे चारपैकी तीन दिवस बँका बंद​

या निवडणुकीत संस्थाचालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, शिक्षणसंस्था चालक कोण्या उमेदवारासाठी संस्थेतील उमेदवारावर दवाब टाकतात यावर निकाल अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा - शासनाकडून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची फसवणूक

विनाअनुदानीत शिक्षकांवर भिस्त
या मतदारसंघात आठ हजारांच्यावर विनाअनुदानीत शाळेतील शिक्षक मतदार आहेत. अनेकांचे वय पन्नाशीत पोचले तरी, अजून शिक्षण संस्थाचालकांच्या दयेवर त्यांना आपली गुजरान करावी लागत आहे. गेल्या अठरा वर्षांत तीन निवडणुका झाल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक उमेदवार यावेळी अनुदान मिळवून देतोच असे छातीठोकपणे सांगतात. मात्र निवडणुका आटोपल्यानंतर विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांच्या समस्येकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही हा इतिहास आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Teachers Constituency: All the problems suddenly broke out, everyones claim in the election battle