esakal | शिक्षक मतदारसंघ निवडणूक; उमेदवाराने चक्क शर्ट काढून भरला अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

 Akola News: Teachers Constituency Election; The candidate filled the application by removing the shirt

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा विनोदी मराठी चित्रपट अनेक जणांच्या स्मरणात राहीला तो त्यातील एका प्रसंगामुळे.

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; उमेदवाराने चक्क शर्ट काढून भरला अर्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि.वाशीम)   : गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा विनोदी मराठी चित्रपट अनेक जणांच्या स्मरणात राहीला तो त्यातील एका प्रसंगामुळे.

उमेदवारी करणारा अभिनेता मकरंद अनासपुरे (नाऱ्या) अनामत रक्कम म्हणून चिल्लर घेऊन येतो. ही चिल्लर मोजण्यात बराच वेळ खर्ची पडत असल्याने निवडणूक कार्यालयातील कर्मचारी अन् बाहेर ताटकळत असलेल्या उमेदवारांनाही घाम फुटतो.

असेच काहीसे प्रसंग आता घडू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थोडाच कालावधी शिल्लक राहिल्यास जिल्ह्यातील ठराविक उमेदवार अनामत रक्कम म्हणून चिल्लर घेऊन पोहोचतात. 

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020 चे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आज  मानोरा (जि.वाशिम( येथील शिक्षक उपेंद्र बाबाराव पाटिल यांनी चक्क शर्ट काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.

वीस वर्षापासून कार्यरत शिक्षक उपेंद्र बाबाराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल शर्ट काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची महाराष्ट्रातील आमदारकीच्या निवडणुकींमधील ही पहिलीच वेळ, सर्व शिक्षकांना शंभर टक्के अनुदान आणि पेन्शन लागू  नाही याचा निषेध करत अर्धनग्न उमेदवारी अर्ज दाखल केला.


विना अनुदानित शिक्षाकाना 100 टक्के अनुदान द्यावे अशी त्यानी मागणी केलि.20 टक्के अनुदाना असल्याने आपन 20 टक्के च् कापडे का घालु नये?अनुदाना दिले नाही याचा निषेध त्यांनी केला.

(संपादन - विवेक मेतकर)