नीट परीक्षेत अकोल्यातून तेजस राठोड अव्वल

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 17 October 2020

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) यूजी २०२० चा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये तेजस राठोड याने घवघवीत यश मिळवत ६७८ गुण मिळवले. चिराग अग्रवाल याने ६७३ गुण मिळवले.

अकोला  ः राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) यूजी २०२० चा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये तेजस राठोड याने घवघवीत यश मिळवत ६७८ गुण मिळवले. चिराग अग्रवाल याने ६७३ गुण मिळवले.

नीट परीक्षेचा निकाल घोषित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. अकोल्यातील एकूण अकरा विद्यार्थी नीटच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये तेजस राठोड ६७८, चिराग अग्रवाल ६७३, सभ्य शर्मा ६३७, यश राऊत ६६१, इशांत तौसिफ सिद्दिकी ५४१, मुकुंद शिंदे ६३९, तेजस रुहाटिया ६२३, हर्ष कासट ६२५, अदनान जयपुरी ६०६, सिद्धी धर्मापुरीया ६००, सुजित खंडारे ६६२ यांचा समावेश आहे.

सर्वर डाउनमुळे विद्यार्थी हतबल!
शुक्रवारी निकाल जाहीर होताच विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन निकाल पाहण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत नीटच्या अधिकृत संकेतस्थळाचे सर्वर डाउन असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. वारंवार सर्चिंग करूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नव्हता. अखेर रात्री उशिरा हे संकेतस्थळ पूर्ववत झाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Tejas Rathore from Akola tops the exam