esakal | कापसाने भरलेल्या वाहनाखाली दबून तिघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Three killed after being crushed under a vehicle full of cotton

विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर पलटी झालेल्या टाटा ४०७ च्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी, ता.२ डिसेंबर रोजी तालुक्यातील आडसुळ नजीक शेगाव-अकोट रोडवर घडली.

कापसाने भरलेल्या वाहनाखाली दबून तिघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला) : विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर पलटी झालेल्या टाटा ४०७ च्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी, ता.२ डिसेंबर रोजी तालुक्यातील आडसुळ नजीक शेगाव-अकोट रोडवर घडली.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोट येथील मिनी ट्रक टाटा ४०७ क्रमांक एमएच ०४ जीसी ९४२० ही कापसाने भरलेली गाडी अकोटकडे जात असतानाविरुद्ध दिशेने येणारी एमएच २८ एव्ही ३२८८ हिरो डीलक्स या गाडीला धडक देऊन टाटा ४०७ ही गाडी पलटी झाली.

मोटारसायकल स्वार प्रल्हाद किसन अडकणे (रा. शेगाव) तर मिनी ट्रकमधील जमीर शहा शब्बीर शहा (वय ४०, रा. आकोट), शेख मोबीन शेख इमाम (वय ३५ रा. आकोट) असे तिघे इसम जागेवरच ठार झाले. अरुण डांगे व गणेश अगळते (दोन्ही रा. शेगाव) हे गंभीर जखमी झाले.

त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक दिनेश शेळके हे पोलिस उपनिरीक्षक नीलेश देशमुख पोहेकॉ वाकोडे पोकळा, निकेश सोळंके, गणेश सोळंके, राठोड नंदाने यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करता तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविले. सदर घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था काही काळ खोळंबली होती. पुढील तपास उपनिरीक्षक नीलेश देशमुख हे करीत असून सदर अपघातात टाटा ४०७ चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.


दोघांना वाचविण्यात यश
तीन मृतक व्यक्ती व्यतिरिक्त ४०७ या वाहनाच्या वर बसलेल्यापैकी आणखी दोन जण दबले होते. मात्र अडसूळ येथील शुभम नवलकार याने लगेच जेसीबी बोलावून त्याद्वारे ४०७ वाहन उचलन्यात आले. त्यामुळे कापसा खाली दबलेल्या दोघांना वाचविण्यात यश मिळाले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image