सोयाबीन बियाण्यांचे आणखी तीन नमुने प्रयोगशाळेत ‘फेल’

सुगत खाडे  
Friday, 4 September 2020

वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारणाऱ्या दोन कंपन्यांचे बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळले आहेत. सदर कंपन्यांचे तीन सोयाबीनचे बियाणे नमुने अप्रमाणित आढळल्याने कंपन्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल

अकोला :  वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारणाऱ्या दोन कंपन्यांचे बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळले आहेत. सदर कंपन्यांचे तीन सोयाबीनचे बियाणे नमुने अप्रमाणित आढळल्याने कंपन्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

मोठ्या प्रमाणात पिकाचे उत्पादन व्हावे, यासाठी जमीन, पाणी, खत याप्रमाणेच उत्तम दर्जाचे बियाणे असणेही महत्त्वाचे असते. या बियाण्यांचे परीक्षण होऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची बियाणे मिळावित, यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी बियाणे तपासण्याची मोहीम राबविण्यात येते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यासाठी सात तालुका स्तराव सात व जिल्हास्तरावर एक पथक सुद्धा कार्यान्वित करण्यात येते. सदर पथक कृषी निविष्ठा विक्रेता दुकानात जावून बियाणे, खत व किटकनाशकांचे नमुने घेते.

सदर पथकाने या खरीप हंगामात घेतलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांपैकी यापूर्वी सहा बड्या कंपन्यांच्या आठ बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेच्या अहवालात फेल आढळले होते.

त्यानंतर आता बाळापूर तालुक्यात पुन्हा दोन कंपन्यांचे सोयाबीन बियाणे प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळले आहेत. त्यामुळे सदर कंपन्यांवर कृषी विभाग नोटीस जारी करेल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

या कंपन्यांचा समावेश
बाळापूर पंचायत समितीच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या नमुन्यांमध्ये दोन कंपन्यांचे नमुने अप्रमाणित आढळले आहेत. त्यामध्ये रवि सिड्स कंपनीचे दोन तर ओसवाल सिड्सच्या सोयाबीन बियाण्यांचा एक नमुना प्रयोगशाळेच्या अहवालात अप्रमाणित आढळला आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांना आता नोटीस देण्यात येईल.

आतापर्यंत सहा खटले दाखल
सोयाबीनचे बियाणे प्रयोगशाळेत अप्रमाणित आढळल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील न्यायालयात सहा खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सरकारी बियाणे कंपनी महाबीजसह इतर कंपन्यांचा समावेश आहे. तेल्हारा तालुक्यात एक, मूर्तिजापूर दोन व बार्शीटाकळीत तीन खटले दाखल करण्यात आले आहेत.

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार रवी सिड्स व ओसवाल सिड्स कंपन्यांचे अनुक्रमे दोन व एक बियाणे नमुने प्रयोगशाळेच्या अहवाल फेल आढळले आहेत. त्यामुळे संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांना नोटीस जारी करण्यात येईल व त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- मुरलीधर इंगळे,
कृषी विकास अधिकारी,
जिल्हा परिषद, अकोला
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Three more samples of soybean seeds fail in laboratory