Video : थरारक रेस्कू ऑपरेशन: सत्तर फुट खोल विहिरीत जाऊन पडली गाय

संजय वाट, बार्शिटाकळी
Friday, 14 August 2020

संताजी नगर तेलीपुरा भागातील रस्त्यावर असलेल्या ७० फुट खोल आणि तीन फुट अरुंद विहरीत पडलेल्या गाईला तीन तासाच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुखरुप बाहेर काढले. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने ही कामगिरी केली.

बार्शीटाकळी (जि.अकोला) :  संताजी नगर तेलीपुरा भागातील रस्त्यावर असलेल्या ७० फुट खोल आणि तीन फुट अरुंद विहरीत पडलेल्या गाईला तीन तासाच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुखरुप बाहेर काढले. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने ही कामगिरी केली.

गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास विहिरीत गाय पडली होती. बार्शीटाकळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

विहीर सत्तर फुट खोल आणि तीन फुट रुंद असल्याने गाय काढणे अशक्य होते. दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ऋषीकेश तायडे, अंकुश सदाफळे, मयुर सळेदार, सूरज ठाकूर, मयूर कळसकार, राहुल जवके, आशिष गुगळे यांनी गाईला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खाली पाणी आणि मिथेन गॅस असल्याने आतमध्ये जाणे अशक्य होते.

परंतु मोठ्या चिकाटीने व धाडसाने रेस्क्यू ऑपरेशन ऑपरेशन यशस्वी केले. जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी अरुंद विहरीतून गाईला कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देता दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास सुखरुप बाहेर काढले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Thrilling rescue operation: A cow fell into a seventy feet deep well