
प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020-21 रब्बी हंगामाकरिता लागू करणेबाबत शासनाने 29 जूनच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिलेली आहे. रब्बी हंगाम सन 2020 अंतर्गत सदर योजनेत सहभाग नोंदविण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2020 असून उद्याचा शेवटचा दिवस आहे.
बुलडाणा : प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2020-21 रब्बी हंगामाकरिता लागू करणेबाबत शासनाने 29 जूनच्या शासन निर्णयाव्दारे मान्यता दिलेली आहे. रब्बी हंगाम सन 2020 अंतर्गत सदर योजनेत सहभाग नोंदविण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2020 असून उद्याचा शेवटचा दिवस आहे.
यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-21 विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची जिल्ह्यासाठी निवड केली आहे.
या कंपनीचा पत्ता ब्लॉक ए, हेरिटेज हाउस, तळ मजला,6 अ, रमाबाई आंबेडकर, पुणे -411001 असा आहे. कंपनीला टोल फी क्र. 18001035499 आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे.
तरी सदर योजनेचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू, भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी न.म.नाईक यांनी केले आहे. शेतकर्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर (प्रती हेक्टरी), पीक, विमा संरक्षित रक्कम (प्रती हेक्टरी) : गहू- विमा संरक्षित रक्कम 38 हजार रुपये, विमा दर 570 रुपये प्रती हेक्टरी, हरभरा - विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये, विमा दर 525 रुपये प्रती हेक्टरी, रब्बी कांदा : विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये, विमा दर 4000 रुपये प्रती हेक्टरी राहणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)