esakal | आनंदावर विरजण! सणासुदीच्या काळातसुरू केलेल्या रेल्वे दिवाळीतच बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: Trains started during festival closed during Diwali

कोरोना संकट काळानंतर रेल्वेचा गाडा हळूहळू रुळावर येण्याची शक्यता होती. मात्र रेल्वेला प्रवाशांचा विश्वास संपादन करण्यात अपयश आल्याने उत्सवी गाड्या ऐन दिवाळीत रद्द करण्याची नामुष्की दक्षिण मध्य रेल्वे विभागावर ओढवली आहे.

आनंदावर विरजण! सणासुदीच्या काळातसुरू केलेल्या रेल्वे दिवाळीतच बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः कोरोना संकट काळानंतर रेल्वेचा गाडा हळूहळू रुळावर येण्याची शक्यता होती. मात्र रेल्वेला प्रवाशांचा विश्वास संपादन करण्यात अपयश आल्याने उत्सवी गाड्या ऐन दिवाळीत रद्द करण्याची नामुष्की दक्षिण मध्य रेल्वे विभागावर ओढवली आहे.


दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अत्यंत कमी प्रवासी संख्या असल्यामुळे काही उत्सव विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वे ने उत्सव काळात प्रवाशांच्या सोयी करिता उत्सव विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.

या पैकी काही उत्सव विशेष गाड्यांमध्ये प्रवाशी संख्या अत्यंत कमी असल्यामुळे या गाड्या रद्द करण्यची वेळ आली आहे. कोरोना संकट काळानंतर दिवाळीत प्रवाशांना सोयीच्या व्हावे या उद्देशाने या गाड्या आरक्षण तिकिटावर सुरू करण्यात आल्या होत्या.


नियोजन चुकले
मुळात दक्षिण मध्ये रेल्वकडून सुरू करण्यात आलेल्या उत्सवी गाड्यांपैकी बहुतांश गाड्यांमधून अनारक्षित तिकिटांवरच अधिक प्रवाशी प्रवास करीत होते. अकोला मार्गे धावणाऱ्या काचिगुडा इंटरसिटी एक्स्प्रेसमधून अकोला ते नरखेड व अकोला ते वाशीम, पूर्णा, हिंगोलीपर्यंत अनारक्षित तिकिटांवर प्रवाश करणारे अधिक प्रवाशी होते. त्यांना सुविधा न मिळाल्याने ते या गाड्यांकडे वळलेच नाही. येथेच रेल्वेचे नियोजन चुकले व उत्सवी गाड्या रद्द करण्याची वेळ दक्षिण मध्य रेल्वे विभागावर आली.


दिवाळीनंतर मिळाली असता प्रतिसाद
मुळात दिवाळीपूर्वी या गाड्या सुरू करण्यात आल्याने त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच होती. या गाड्यांवर दिवाळीनंतर प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. मात्र तोपर्यंत प्रतीक्षा न करता दिवाळीपूर्वीच या उत्सवी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची निराशा झाली आहे.


या गाड्या झाल्यात रद्द
- काचीगुडा नरखेड-काचीगुडा इंटरसिटी एक्स्प्रेस
- काचीगुडा -अकोला-काचीगुडा इंटरसिटी एक्स्प्रेस
- नांदेड-पनवेल-नांदेड
- धर्माबाद-मनमाड-धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस

(संपादन - विवेक मेतकर)