दोन लाख चार हजार शेतकऱ्यांनी काढला पिक विमा

 akola news Two lakh four thousand farmers took out crop insurance
akola news Two lakh four thousand farmers took out crop insurance

अकोला  ः जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० करिता शेतकऱ्यांकडून पिक विमा अर्ज जमा करण्यात आले आहे.

३१ जुलै ही प्रधानमंत्री पिका विमा योजनेची अंतिम तारिख होती. आतापर्यंत २ लाख ४ हजार ५८२ शेतकऱ्यांनी पिक विमा काढण्यात आले आहे.

यात १ लाख ९२ हजार ७१५ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असून ११ हजार ८६७ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून १ लाख ९२ हजार ६१२ शेतकऱ्यांनी तर बँकेच्या माध्यमातून ११ हजार ९७० शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे.

त्यात अकोला तालुक्यातील ४३ हजार ८४६, अकोट तालुक्यातील ३१ हजार ५४९, बाळापूर तालुक्यातील ३३ हजार ८६९, बार्शीटाकळी तालुक्यातील २३ हजार ४२६, मूर्तिजापूर तालुक्यातील ३१ हजार ३१५, पातूर तालुक्यातील १७ हजार ७२९, तेल्हारा तालुक्यातील २२ हजार ८९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
 
१.६९ हेक्टर क्षेत्राचा पिक विमा
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ९२१ हेक्टर क्षेत्राचा पिक विमा काढण्यात आला आहे. यामध्ये १३ कोटी ९८ लाख ८० हजार ७७७ रुपयांचा शेतकऱ्यांचा वाटा आहे. राज्य शासन व केंद्र शासनाचा प्रत्येकी ४७ कोटी ३ लाख १७ हजार ५१३ रुपयांचा वाटा आहे. ६४० कोटी ६८ लाख १० हजार १५३ रुपयांचा एकूण पिक विमा उतरविण्यात आला आहे.

कापूस उत्पादकांची पाठ
जिल्ह्यात सोयाबीन पाठोपाठ कापसाचे सर्वाधिक क्षेत्र राहते. असे असतानाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून पीकविम्याला तितकी पसंती मिळालेली नाही. कापूस पिकाला गेल्या काही वर्षात पीकविम्याची नुकसान भरपाई तितकी न मिळाल्याने हे शेतकरी आता निरुत्साही झाले आहेत. अनेकांचे नुकसान होऊनही विमा योजनेत सरासरीच्या आधारे मूल्यांकन होत असल्याचा फटका कापूस पिकाला बसत आहे. त्यामुळे कापूस पिकासाठी पीकविमा मिळत नाही. त्यामुळे यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत अवघ्या ५७५३ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. येत्या तीन दिवसांची मुदत संपल्यानंतर यात आणखी थोडी फार वाढ होईल. मात्र, सोयाबीनच्या तुलनेत कापूस उत्पादकांमध्ये निरुत्साह असल्याचे स्पष्ट होत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com