रस्त्यावर चालणेही झाले कठीण, जड वाहनाने दोन महिला मजुरांना उडविले

श्रीकृष्ण लखाडे
Tuesday, 8 September 2020

पातूर तालुक्यातील चान्नी-पिंपळखुटा मार्गावरील जड वाहनाने दोन महिला मजुरांना उडविण्याची घटना सोमवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात चान्नी येथील शीलाबाई शांताराम सदार ही महिला जागीच ठार झाली; तर चान्नी येथीलच बेबी दयाराम सोनोने ही महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

चतारी (जि.अकोला) : पातूर तालुक्यातील चान्नी-पिंपळखुटा मार्गावरील जड वाहनाने दोन महिला मजुरांना उडविण्याची घटना सोमवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात चान्नी येथील शीलाबाई शांताराम सदार ही महिला जागीच ठार झाली; तर चान्नी येथीलच बेबी दयाराम सोनोने ही महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार प्रमोद ताले यांच्या शेतात उडदाच्या शेंगा तोडण्यासाठी सोमवारी (ता. ७) दोन महिला मजूर पायी जात होत्या. चान्नी येथून पिंपळखुटाकडे जाणाऱ्या एमएच-१४-७२४५ क्रमांकाच्या वाहनाने सदर दोन्ही मजूर महिलांना उडविले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामध्ये शीलाबाई शांताराम सरदार महिला जागीच ठार झाली, तर दुसरी महिला बेबी दयाराम सोनोने गंभीर झाल्या. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार उपनिरीक्षक रामराव राठोड व त्यांचे सहकारी पंचभाई, संतोष जाधव, बालाजी सानप, रावसाहेब बुधवंत, किरण गवई आदींनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह व गंभीर दोघांना ग्रामस्थांच्या मदतीने उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविले.

दोन्ही मजूर महिलांना उडविल्यानंतर वाहन चालक व मजूर घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी चालकाविरुद्ध भादविच्या ३०४, २७९, ३३८ व १३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिक कर्मचारी किरण गवई करत आहे.
 
रस्त्यावर धावतात ‘यमदूत’
चांगेफळ नदीपात्रातून दिवसाढवल्या वाळू उत्खनन करण्यात येते. यामार्गावर दररोज २५ ते ३० वाहन वाळूची वाहतूक करतात. एक रॉयल्टी वर दिवसभरात तीन ते चार वेळा वाळू उत्खनन करण्यात येते. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या परिसरात अनेक किरकोळ दुर्घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे महसूल विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्या वाहनाने दोन मजूर महिलांना उडविले ते वाहन सुद्धा वाळू भरुन आणण्यासाठी जात असल्याचे, उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News Two women laborers were blown up by a heavy vehicle

टॉपिकस
Topic Tags: