
वारकऱ्यांना धार्मिक कार्य करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेसह वारकऱ्यांच्या इतर संघटनांनी केलेल्या उपोषणाचा मुद्दा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे.
अकोला : वारकऱ्यांना धार्मिक कार्य करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेसह वारकऱ्यांच्या इतर संघटनांनी केलेल्या उपोषणाचा मुद्दा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे. १४ डिसेंबर रोजी सुरू होत असलेल्या अधिवेशनात भाजप आमदार रणधीर सावरकर औचित्याच्या मुद्याद्वारे वारकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणणार आहेत. हे ही वाचा : शेतकरी आत्महत्येची १२ प्रकरणं अपात्र तर १३ पात्र ; ६ फेरचौकशीसाठी प्रलंबित राज्यातील मंदिरं काही दिवसांपूर्वी उघडण्यात आली. मात्र धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नसल्याने वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्रातील इतर वारकरी संघटनांच्या माध्यमातून २ डसेंबर राेजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. या प्रकरणी प्रशासनातर्फे चर्चा केल्यानंतर सुद्धा तोडगा निघाला नाही. परिणामी अखेर ९ डिसेंबर राेजी शिवसेनेचे आमदार गाेपकिशन बाजाेरीया आणि भाजपचे आमदार रणधिर सावरकर यांच्याशी वारकऱ्यांनी मंडपात चर्चा केली. चार दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याची ग्वाही शिवसेना आमदारांनी दिली हाेती. त्यामुळे मुुख्य उपाेषणकर्ते हभप गणेश महाराज शेटे यांनी हे उपाेषण मागे घेतल्याचे जाहीर केले हाेते. हे ही वाचा : अकोल्याचे बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा आमदारांनी केली होती मध्यस्थी (संपादन - विवेक मेतकर) |
|||