शेतीसाठी पाणी हवे, तर 15 डिसेंबरपर्यंत करा अर्ज

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 5 December 2020

अकोला पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त येत असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांवर सन 2020-21 मध्ये प्रकल्पांचे जलाशयात उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे.

अकोला: अकोला पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त येत असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांवर सन 2020-21 मध्ये प्रकल्पांचे जलाशयात उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे.

 सिंचनसाठी पाणी उपलब्ध करुन देणे असलेल्या क्षेत्राबाबतची माहिती संबंधीत शाखा कार्यालयात शाखाधिकारी यांचे मार्फत प्राप्त करन देण्यात येईल.

तरी प्रकल्पांचे लाभ धारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज 15 डिसेंबर पर्यंत संबंधीत शाखा कार्यालयात प्रत्यक्ष किवा रजिस्टर पोष्टाने पाठवावे, असे आवाहन अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Water demand applications invited till December 15