esakal | अरे देवा ! आता कपाशीवर पांढरी माशी, फुलकिडीचे आक्रमण,  कमी पर्जन्यमान व अधिक तापमानामुळे वाढला प्रादुर्भाव
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News White fly on cotton, infestation of cauliflower,Increased incidence due to low rainfall and high temperature

कपाशी पिकावर फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

अरे देवा ! आता कपाशीवर पांढरी माशी, फुलकिडीचे आक्रमण,  कमी पर्जन्यमान व अधिक तापमानामुळे वाढला प्रादुर्भाव

sakal_logo
By
दीपक हागे

टुनकी (जि.बुलडाणा)  ः कपाशी पिकावर फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

संग्रामपूर तालुक्यात मृग नक्षत्रात पेरणी झाल्यामुळे कपाशी फुल पात्या लागण्याच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंड आणि वाढते तापमान फुलकिडे आणि पांढरी माशी करीता पोषक असल्याने प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

फुलकिडे ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून, अत्यंत बारीक असते. त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ असतात.

सर्वसाधारणपणे हे किडे पानाच्या मागच्या बाजूस आढळतात. पानाचा वरचा पापुद्रा खरवडून अन्नरस शोषतात. परिणामी पाने निस्तेज होतात. पांढुरके व नंतर तपकिरी डाग दिसू लागतात. अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये पानाची गळ होते.

ड्यूटीवर जाणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या दुचाकीसमोर अचानक आले वाहन अन्

दिर्घकाळ कोरडे व उष्ण हवामान राहिल्यास व पावसाने दांडी मारल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. जोराच्या व सततच्या पावसाने संख्या कमी होते. या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वाधिक आढळतो.

त्याचप्रमाणे पांढरी माशी ही १ ते २ मी. मि. लांब, रंगाने पिवळसर, पांढरट असून, पंख पांढऱ्या किवा करड्या रंगांची असते. या किडीचे पिल्ले, प्रौढ पानाच्या खालील बाजूस राहून पानातील रस शोषतात. पाने कोमेजतात, माशीच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या चिकट पदार्थांमुळे पानावर काळी बुरशी चढते.

बिल्डरांच्या स्वार्थापायी अडले सांडपाणी

पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबली गेल्याने कपाशीच्या उत्पादन, प्रत यावरही अनिष्ट परिणाम होतो. सध्या या दोन्ही कीडीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर महिन्यांपासून ते नोव्हेंबर अखेर जास्त आढळतो.

कमी पर्जन्यमान व अधिक तापमान या किडीच्या वाढीस पोषक आहे. अधिक पाऊस व ढगाळ वातावरणात किडीची संख्या कमी होते. मात्र यावर्षी जुलै, आगस्ट महिन्यांत तापमानांत प्रचड वाढ आणि पावसात दहा ते पंधरा दिवसाचे खंड पडत असल्याने फुलीकडे आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.

५ एकरात कपाशी लावगड केलेली आहे, सध्या कपासी फुल, पात्या लागण्याच्या अवस्थेत आहे. पांढरी माशी आणि फुलकिडे याचे प्रमाण दिवसे दिवस वाढतच आहे. महागडे किटकनाशकाचा काहीच परिणाम होतांना दिसत नाही. आठ दिवसाआड फवारणी करावी लागत आहे.
-प्रमोद राहाने, शेतकरी टुनकी.
(संपादन - विवेक मेतकर)