एकनाथरावांना सासुरवाडीतून कोण साथ देणार ?

अरूण जैन 
Saturday, 24 October 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक जण जातील अशा चर्चा होत्या मात्र त्यांची सासुरवाडी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथूनही त्यांच्यासोबत कुणीही गेले नाही.

बुलडाणा  : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक जण जातील अशा चर्चा होत्या मात्र त्यांची सासुरवाडी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथूनही त्यांच्यासोबत कुणीही गेले नाही.

 ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे बुलडाणा जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध आहेत.  श्री खडसे बुलडाण्याचे पालकमंत्री होते.  याशिवाय त्यांच्या कन्या रोहिनी खडसे या देखील बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये उमेदवारी घेण्यास इच्छुक होत्या.

सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

त्याचप्रमाणे  माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपचे नेते योगेंद्र गोडे ॲड व्ही. डी. पाटील यांच्यासह अनेकांचे श्री. खडसे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते यापैकी विजयराज शिंदे नुकतेच भाजप मध्ये आले आहेत.

तर जिल्ह्यातील इतर कोणीही मोठा नेता त्यांच्यासोबत पक्ष सोडण्यास तयार नसल्याचे आज तरी दिसत आहे.

 आगामी काळात राष्ट्रवादी च्या माध्यमातून काही नेत्यांना जवळ करण्याचा प्रयत्न होतो काय हे पहावे लागणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Who will support Eknath Khadse?