भिक्षा मागण्यासाठी आलेल्या महिलेवरच केला अत्याचार

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 3 October 2020

भिक्षा मागण्यासाठी घरा समोर आलेल्या भिक्षेकरी महिलेचा हात धरून घरात ओढत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या बार्डा (ता. मेहकर) येथील ७३ वर्षीय आरोपीस जानेफळ पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

जानेफळ (जि.बुलडाणा)  : भिक्षा मागण्यासाठी घरा समोर आलेल्या भिक्षेकरी महिलेचा हात धरून घरात ओढत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या बार्डा (ता. मेहकर) येथील ७३ वर्षीय आरोपीस जानेफळ पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वरवंड येथील ४० वर्षीय भिक्षेकरी महिला नजीकच असलेल्या बार्डा या गावात गुरुवारी भिक्षा मागण्यासाठी गेली असताना आरोपी बळीराम शिवराम बार्डेकर याने तिला घरासमोरून जात असताना भीक्षा घेण्यासाठी घरात बोलावून हात धरीत आत ओढले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना दुपारी १ ते २ वाजे दरम्यान घडली होती.

यावेळी तिने आरडाओरड केल्याने शेजारील लोक जमा झाल्यानंतर आरोपीने तिला घराबाहेर ढकलून देत दरवाजा आतून लावून घेऊन. स्वतःला कोंडून घेतले होते. सदर घटनेनंतर पीडितेस घेऊन नागरिक जानेफळ पोलिस स्टेशनला पोहचल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आरोपीस अटक केली आहे.

तलावर घेवून फिरणाऱ्याला अटक
अकोला ः कोतवाली परीसरात खोलेश्वर येथे नर्मदाप्रसाद कृष्णमोहन शुक्ला (वय ५०, रा. खोलेश्वर) हा हातात तलवार घेऊन लोकांना धाक दाखवीत फिरत होता. त्याला उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे विशेष पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आर्म ॲक्ट प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: A woman who came to beg was tortured

Tags
टॉपिकस
Topic Tags: