
राष्ट्रीय महामार्ग निगमच्या एका इमारतीचे काम करण्यासाठी १० दहा वर्षांचा कालावधी लागल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काम करणाऱ्या बहाद्दर अधिकारी, अभियंत्यांचे फोटो कार्यालयात लावा असे उदिग्नपणे सांगत असल्याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायलर होतो आहे.
गडकरी साहेब, यांचेही एकदा फोटो लावाच!
अकोला ः राष्ट्रीय महामार्ग निगमच्या एका इमारतीचे काम करण्यासाठी १० दहा वर्षांचा कालावधी लागल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काम करणाऱ्या बहाद्दर अधिकारी, अभियंत्यांचे फोटो कार्यालयात लावा असे उदिग्नपणे सांगत असल्याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायलर होतो आहे.
याच विभागातर्फे अमरावती ते चिखलीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन गडकरी साहेब २०१५ मध्ये तुमच्या हस्ते सन २०१५ मध्ये करण्यात आले होते. हे काम २०२० संपत आले तरी सुरू झाले नाही. तेव्हा हे काम करणाऱ्या अधिकारी-अभियंत्यांचेही फोटोही एकदा कार्यालयात लावाच, अशी भावना जनसामान्यांमध्ये दिसून येत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि केंद्रीय निधी मार्ग अंतर्गत अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम २०१५ पासून रखडलेले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर प्रत्यक्ष कामाला सुरू झाली. काही प्रमाणात काम झाल्यानंतर २०१८ मध्ये काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने हे काम बंद केले.
तेव्हापासून अमरावती ते अकोलापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चाैपदरीकरणाचे काम अमरावती ते जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील चिखलीपर्यंत करण्यात येणार आहे. अमरावती ते चिखलीपर्यंत एकूण १९४ किलोमीटरचे काम २३०० कोटी रुपये खर्च करून चार टप्प्यात करण्यात येणार आहे. नव्याने निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहे.
मात्र अद्यापपर्यंत हे काम सुरू झालेले नाही. या मार्गावर अमरावती-मूर्तिजापूर-बोरगाव मंजू परिसरात लहान पुलांची निर्मिती केली जाणार आहे. चिखलीपर्यंत १४ लहान पूल बांधले जाणार आहेत, त्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आणखी ५० पुलांची निर्मिती होणार आहे.
या कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या स्वीय सहायकांना पाठविले होते. त्यांनी आढावा घेवूनही आता वर्ष उलटले आहे. त्यानंतरही काम सुरू होण्यास विलंब होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोटो एकदाचे कार्यालयात लावून त्यांचा सत्कार करूनच टाका असे भावना आता जनमानसांमध्ये उमटत आहे.
अकोला जिल्ह्यातच काम रखडले?
राष्ट्रीय महामार्गाची कामे बुलडाणा व अमरावती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात झाली आहेत. मात्र अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि अकोला-अकोटपर्यंतच्या महामार्गाचे काम सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप पूर्ण झाले नाही. येथील राजकीय इच्छाशक्ती त्यासाठी कमी पडत आहे. असे असले तरी ज्या विभागाचे काम आहे, त्या विभागाचे मंत्री व येथील राजकीय नेतृत्व हे एकाच पक्षाचे असतानाही कामात प्रगती नसल्याने ‘पडद्या’ मागील घडामोडीबाबत सर्वसामान्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
Web Title: Akola News Work National Highway No 6 Has Been Stalled Six Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..