
महाराष्ट्र राज्य कला प्रतिवर्षी चित्रकला ग्रेड परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये मिळालेल्या ग्रेड मुळे दहवीच्या एकूण टक्केवारी वाढते होते. यावर्षी ही परीक्षा होते की नाही हीच निश्चित नाही.जर परीक्षा झाली नाही तर दहावी तील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट होईल. त्यामुळे नियोजन करून परीक्षा घ्यावी अशी, कला शिक्षक व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
तेल्हारा (जि.अकोला) : महाराष्ट्र राज्य कला प्रतिवर्षी चित्रकला ग्रेड परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये मिळालेल्या ग्रेड मुळे दहवीच्या एकूण टक्केवारी वाढते होते. यावर्षी ही परीक्षा होते की नाही हीच निश्चित नाही.जर परीक्षा झाली नाही तर दहावी तील विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट होईल. त्यामुळे नियोजन करून परीक्षा घ्यावी अशी, कला शिक्षक व विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य कला संचानालया तर्फे प्तती वर्षी घेतल्या जाणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देतात.कलाक्षेत्रात करिअर करण्यासाठी ही परीक्षा पाया समजले जाते.त्यामुळे या परीक्षेला अनन्य साधारण महत्त्व आहे.
इंटरमिजिएट परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रेड नुसार दहावीच्या बोर्ड परीक्षेत वाढीव गुण दिल्या जातात.गतवर्षी अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेमुळे मिळणाऱ्या वाढीव गुणाचा फायदा होऊन त्यांच्या एकूण टक्केवारीत वाढ झाली,
परंतु यावर्षी कोविड-१९ मुळे चित्रकला ग्रेड परीक्षा होतील की नाही या संभ्रमात कला शिक्षक व विद्यार्थी आहेत.जर या परीक्षा घेतल्या नाहीत तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.कोरोना मुळे आतापर्यंत प्रत्यक्ष शिक्षणाऐवजी ऑनलाईन किंवा व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून शिकवले जात होते.
ता.२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग विशिष्ट अटींसह सुरू करण्यात आले आहेत; पण अभ्यासक्रमाबाबत अद्याप संभ्रम कायम असला तरी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणार असल्याचे घोषित करण्यात आले.
तत्पूर्वी, चित्रकला ग्रेड परीक्षा घेंणे गरजेचे आहे. गतवर्षी ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरीची परीक्षा दिलेली आहे, त्यांना यावर्षी इंटरमिजिएट परीक्षा द्यायची आहे व वाढीव गुणासाठी पात्र व्हायचे आहे; पण याबाबत अद्याप कुठलाच निर्णय झाला नसल्याचे विश्वसनीय माहिती आहे.
जर ग्रेड परीक्षा घेण्यात येणार नसेल तर ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना कोरोणा पार्श्वभूमीवर सरासरी गुण देण्यात यावे
-नीलेश सानप,कलाशिक्षक,बेलखेड
(संपादन - विवेक मेतकर)