Akola: महापालिका क्षेत्रात रात्रीचे लसीकरण सत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine
महापालिका क्षेत्रात रात्रीचे लसीकरण सत्र

अकोला : महापालिका क्षेत्रात रात्रीचे लसीकरण सत्र

अकोला : शहरातील रहिवाशी नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण करता यावे यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत रात्रीचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे सत्र सुरु करण्यात आले आहेत. सदर सत्र शहरातील पाच केंद्रांवर होणार आहेत. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला विशेष महत्व आहे. पहिल्या लाटेनंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत आरोग्य विभागामार्फत नागरिकांच्या लसीकरणावर जोर देण्यात येत आहे.

अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी नागरिकांना लस सुद्धा मोफत देण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लस घेणाऱ्यांवर विषाणूचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा लसवंतावर फारसा प्रभाव न झाल्याचे तज्ज्ञांचा दावा आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येणाऱ्या शक्यता सुद्धा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सदर लाट थोपवण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र उपाय असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्यासाठी व अधिकाधिक नागरिकांना लस मिळावी यासाठी जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सदर मोहिमेअंतर्गत लसीकरण सत्रांचे अधिक आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढली असली तरी अधिकाधिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील पाच केंद्रांवर सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत लसीकरण लसीकरण घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

या ठिकाणी विशेष सत्र - भरतीया हॉस्पिटल, टिळक रोड - मनपा शाळा क्रमांक ८, लकडगंज - फातिमा हॉस्पिटल, सोलासो प्लॉट, अकोट फैल - डॉ. तस्वीर अहमद, जुल्फकार नगर (डाबकी रोड) - शिवाजी नगर, हरिहर पेठ

loading image
go to top