Akola: नऊ दिवसांत दीड कोटीचे उत्पन्न बुडाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus
नऊ दिवसांत दीड कोटीचे उत्पन्न बुडाले

अकोला : नऊ दिवसांत दीड कोटीचे उत्पन्न बुडाले

अकोला : राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसह इतरही मागण्यांकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपामुळे नऊ दिवसात अकोला विभागाचे एक कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. लाल परीची चाके थाबंल्यामुळे संप काळात चार हजार ५०० बसच्या पाच लाख किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. डिझेलच्या किमती वाढल्याने एसटी बसचा दैनंदिन खर्च भागवणेही कठीण होत आहे. डिझेलचे दर वाढतच असून, राज्य शासनाकडून महामंडळाला तुटपुंजी मदत मिळते.

यासह कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर दिवाळीनंतर मार्ग काढू, असेही वचन सरकारकडून देण्यात आले हाेते. मात्र वचन पाळले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रविवारी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य भरातील कर्मचाऱ्यांसोबतच रविवारपासून अकोला विभागातील कर्मचारीही संपावर गेले आहे. त्यापूर्वी २७ ऑक्टोबरपासूनच एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. रविवारी सकाळपासूनच विविध मागण्यांसाठी एसटीच्या विविध कामगार संघटनांनी एकत्र येत बेमुदत उपोषणासोबतच एसटीचा चक्का जाम करीत आंदोलन अधिक तीव्र केले. अकोला शहरातूनच राेज जळवपास १० हजार प्रवासी प्रवास करतात.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

खासगी वाहनांकडून लुट राेज मध्यवर्ती व जुन्या बस स्थानकासमाेरून अवैध प्रवासी वाहतूक हाेते. या खासगी वाहतुकदारांचे कर्मचारी बस स्थानकाबाहेर ओरडून प्रवासी भरत असतात. मात्र एसटीचा संप सुरू असल्याने त्यांनी थेट बसस्थानकावरच धाव घेत प्रवाशांना खासगी वाहतुकीकडे वळवल्याचे दिसून आले. या खासगी वाहतूकदारांना आता राज्य शासनानेही प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आहे. त्याचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा दराने तिकीट आकारून प्रवाशांची लुट केली जात आहे.

रेल्वेवरील गर्दी वाढली एसटीच्या संपामुळे रेल्वेवरील गर्दी वाढली आहे. मात्र, आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नसल्याने अनेकांच्या पदरी निराशा येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने आधीच आरक्षण हाऊसफुल्ल आहे. त्यात आता एसटीच्या संपामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.

अकोला विभागातील रद्द झालेल्या बस फेऱ्या तारीख रद्द फेऱ्या बुडालेले उत्पन्न २९ ऑक्टोबर ८३ दोन लाख ३५ हजार २८ ऑक्टोबर ६३५ १७ लाख ३३ हजार २९ ऑक्टोबर ६०५ १५ लाख ३७ हजार ४ नोव्हेंबर १०२ तीन लाख २९ हजार ५ नोव्हेंबर १५० आठ लाख ६७ हजार ६ नोव्हेंबर १४३ १० लाख ९४ हजार ७ नोव्हेंबर ७०४ २६ लाख २२ हजार ८ नोव्हेंबर ९३२ ३८ लाख ४७ हजार ९ नोव्हेंबर १०७९ ३९ लाख ९३ हजार एकूण ४४३३ एक कोटी ६१ लाख ७७ हजार

loading image
go to top