Akola No Hawkers Zone : अकोल्यातील नो हॉकर्स मार्गावर मनपाचा हातोडा; अतिक्रमण हटवून साहित्य जप्त

Encroachments Removed From No Hawkers Routes : मनपा समोरील रस्ता, नवीन बसस्थानक, जनता भाजी बाजार आणि जुने बसस्थानक परिसरातील अतिक्रमित साहित्य व हातगाड्या हटविण्यात आल्या.
Akola No Hawkers Zone

Akola No Hawkers Zone

esakal

Updated on

अकोला : पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार आणि सर्वसाधारण सभेतील निर्णयाच्या आधारे अकोला महानगरपालिकेने सोमवारी (ता. २१) शहरातील नो हॉकर्स मार्गावरील अतिक्रमणाविरुद्ध निष्कासनाची कारवाई केली.

मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार आणि सहायक आयुक्त तथा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मनपा समोरील रस्ता, खुले नाट्यगृह परिसर, हॉकर्स झोनसमोरील रस्ता, नवीन बसस्थानक, जनता भाजी बाजार तसेच जुने बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईदरम्यान रस्त्यांवर उभ्या करून व्यवसाय करणाऱ्या कपडे विक्री, ऑम्लेट विक्री तसेच फळविक्रीच्या चारचाकी हातगाड्या व इतर साहित्य हटविण्यात आले.

Akola No Hawkers Zone
Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

काही ठिकाणी अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आले. जैन मंदिर परिसर तसेच मनपा कार्यालयासमोरील दुकानांच्या बाहेर रस्त्यावर ठेवण्यात आलेले साहित्यही मनपा पथकाने जप्त केले. नो हॉकर्स मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटविण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या कारवाईत सहायक अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील नो हॉकर्स मार्गावरील अतिक्रमणाविरोधात पुढील काळातही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com