Kolhapur accident Poonam Shinde death
esakal
कोल्हापूर : खराब रस्त्यामुळे काल सकाळी एका कुटुंबातील कर्त्या महिलेला प्राण गमावावा लागला. मोपेड घसरून त्या रस्त्यावर पडल्या आणि त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली त्यांचे डोके चिरडले (Shahupuri Road Accident) गेले. पूनम रामेश्वर शिंदे (वय ४६, रा. उद्योग भवनशेजारी, कनाननगर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या सोबत असणारी त्यांची मुलगी एंजल (२०) किरकोळ जखमी झाली.