esakal | अकोला: अकराव्या दिवशी मिळाला नदीत वाहून गेलेल्या दर्शनचा मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेह

अकोला: ११व्या दिवशी मिळाला नदीत वाहून गेलेल्या दर्शनचा मृतदेह

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अकोला : पूर्णा नदी पात्रात अखंड सर्च ऑपरेशन राबविल्यानंतर ११व्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता. ११ सप्टेंबर) अकोला येथील दर्शन शुक्लाचा मृतदेह शोधण्यात जिल्ह्यातील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे व त्यांच्या सहकार्यांना यश मिळाले. दर्शनचा मृतदेह शनिवारी सकाळी ९.३० वाजता जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहून गाव परिसरातील मुक्ताई मंदिराजवळ अतिशय कुंजलेल्या व दुर्गंध येत असलेल्या स्थितीत मिळून आला.

हेही वाचा: बुलडाणा : ॲग्रो एजन्सीला आग लागून लाखोंचे नुकसान

जिल्ह्यातील बोरगाव वैराळे परिसरातील पूर्णा नदीपात्रातून दर्शन शुक्लाचा मृतदेह १ सप्टेंबर रोजी वाहून गेला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी ३ सप्टेंबर पासून खिरोडा येथे बोट टाकून पूर्णा नदी पात्रात सर्च ऑपरेशन सुरू केले होते.

तेव्हा पासून त्यांचे सर्च ऑपरेशन प्रत्येक दिवशी सुरूच होते. चार दिवसांपूर्वी विदर्भात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णा नदीला महापूर आला होता. त्यामध्ये सुद्धा दीपक सदाफळे यांनी सर्च ऑपरेशन चालूच ठेवले. दहा दिवस उलटूनही दर्शनचा मृतदेह मिळत नसल्याने सर्वांनी आशा सोडली होती.

मात्र हार न मानता दीपक सदाफळे आणि पथकातील इतर सदस्यांनी शेवटी तापी-पूर्णानदी ढवळून काढली व अखेर ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता दर्शनचा मृतदेह तापी नदीच्या पुरात मुक्ताई नगर तालुक्यातील मेहुन गाव परिसरातील मुक्ताई मंदिराजवळून शोधून काढला. सर्च ऑपरेशनमध्ये दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ऋषीकेश राखोंडे, गोकुळ तायडे, चेतन इंगळे, संकेत देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

मुंडके धडावेगळे तुटून पडण्याच्या स्थितीत

दर्शन शुक्लाचा मृतदेह अतिशय कुंजलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या मृतदेहाची अतिशय दुर्गंधी येत होती. त्यासोबच हात-पाय व मुंडके धडावेगळे तुटून पडण्याच्या स्थितीत होते. सदर मृतदेहाला सुरक्षितरित्या पाण्याच्या विरूद्ध दिशने सुरक्षित स्थळी आणने मोठे शर्थीचे होते. परंतु त्यामध्ये सुद्धा दीपक सदाफळे यांनी प्रसंगावधान दाखवत दर्शनचा मृतदेह सुरक्षित नदीतून बाहेर काढला.

loading image
go to top