esakal | बुलडाणा : ॲग्रो एजन्सीला आग लागून लाखोंचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

बुलडाणा : ॲग्रो एजन्सीला आग लागून लाखोंचे नुकसान

बुलडाणा : ॲग्रो एजन्सीला आग लागून लाखोंचे नुकसान

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : सिंदखेड राजा येथील श्रीराम ॲग्रो एजन्सीच्या गोदामाला शनिवारी पहाटे सकाळी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला.

शहरातील महालक्ष्मी रेसिडेन्सी येथे दिलीप चौधरी यांचे कृषी साहित्य व इलेक्ट्रिक बाईकचे दुकान आहे. शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास दुकानामागील गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये ठिबक व तुषारचे संच, कृषी पाईप, विविध कृषी साधने त्याचबरोबर इलेक्ट्रिक मोटारसायकलचा ठेवलेल्या होत्या. शॉर्कसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आगीत चौधरी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाले. गोडाऊनच्यावर समृद्धी महामार्गाचे कार्यालय असून आगीत कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती गोरख्याने परिसरातील नागरिकांना दिली. त्यानंतर दिलीप चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: ट्रेकिंग : फिरण्यापेक्षा हटके अनुभव घेण्याचा करा प्रयत्न

यानंतर चार खासगी पाणी टँकर बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न झाला. जालना येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु, सकाळी पाच वाजता जालना येथून फायरबंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत साहित्याची राख झाली होती. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार केशव वाघ, नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, माजी नगराध्यक्ष विष्णू मेहेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

loading image
go to top