पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात उद्रेक, काँग्रेसचे धरणे, शिवसेनेने जाळला पेट्रोलियम मंत्र्यांचा पुतळा

सकाळ वृत्तसेेवा
मंगळवार, 30 जून 2020

आंतरराष्ट्रीय बाजार कच्चा इंधनाचे दर कमी झाले असताना त्याचा फायदा जनतेला न देता उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नागरिकांची आर्थिक लुट केली जात आहे. त्या निषेधार्थ अकोल्यात महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.

अकोला  ः आंतरराष्ट्रीय बाजार कच्चा इंधनाचे दर कमी झाले असताना त्याचा फायदा जनतेला न देता उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नागरिकांची आर्थिक लुट केली जात आहे. त्या निषेधार्थ अकोल्यात महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल आणि डिझेलचे दर नव्वदीच्या घरात पोहोचले आहे. महाराष्ट्रातही गेले तीन आठवडे सातत्याने इंधनाची दरवाढ होत आहे. सरकार इंधन दरवाढीवर कोणतेही नियंत्रण आणताना दिसत नाही. परिणामी नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने महागाईही वाढत आहे. त्यात सामान्य माणूस होरपळला जात आहे. परिणामी सोमवारी इंधन दरवाढीविरोधात उद्रेक झाला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी केंद्र शासनाच्या निशेधार्थ आंदोलन केले.

काँग्रेसच्या वतीने स्वराज भवन येथे धरणे देण्यात आली, तर शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात पेट्रोलियम मंत्र्यांचा पुतळा जाळण्यात आला. गांधी चौकात शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवणीकर, तरूण बगेरे, गजानन चव्हाण, नितीन मिश्रा, अश्‍विन नवले, शशिकांत चोपडे, रुपेश ढोरे, संतोष रणपिसे, बबलू उके, शरद तुरकर, योगेश गिते, सागर आप्पा कुकडे, देवा गावंडे, विक्की ठाकूर, जीतू शितोळे, मयुर राठी, राहुल कराळे, अभय कुळकर्णी, सचिन चावरे, श्‍याम झापर्डे आदींनी सहभाग घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola outbreak against petrol-diesel price hike, Congress dams, Shiv Sena burns statue of Petroleum Minister