esakal | निधी वाटपात मिळाले झुकते माप, आता खर्चाचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

aamdar nidhi akola.jpg

दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामीण भागीतील दलित वस्त्यांमध्ये विकास काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला सन्‌ 2019-20 साठी मिळालेल्या 50 कोटी 73 लाख 79 हजार रुपयांच्या निधीचे शुक्रवारी (ता. 10) नियोजन करण्यात आले. सदर नियोजनाला समाज कल्याण समितीने मंजुरी दिली. यावेळी निधी वाटप करताना अकोला पंचायत समितीला (तालुक्‍याला) झुकते माप देत 14 कोटी 35 लाख 57 हजार 256 रुपये देण्यात आले. 

निधी वाटपात मिळाले झुकते माप, आता खर्चाचे आव्हान

sakal_logo
By
सुगत खाडे

अकोला  ः दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ग्रामीण भागीतील दलित वस्त्यांमध्ये विकास काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला सन्‌ 2019-20 साठी मिळालेल्या 50 कोटी 73 लाख 79 हजार रुपयांच्या निधीचे शुक्रवारी (ता. 10) नियोजन करण्यात आले. सदर नियोजनाला समाज कल्याण समितीने मंजुरी दिली. यावेळी निधी वाटप करताना अकोला पंचायत समितीला (तालुक्‍याला) झुकते माप देत 14 कोटी 35 लाख 57 हजार 256 रुपये देण्यात आले. 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये विविध प्रकारची कामे करण्यात येतात. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला सन्‌ 2019-20 साठी 50 कोटी 73 लाख 79 हजार रुपयांच्या निधी मिळाला होता. सदर निधीचे शुक्रवारी (ता. 10) समाज कल्याण समितीच्या सभेत नियोजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतींनी घोषित केलेल्या अनुसूचित जाती वस्त्यांची संख्या, लोकसंख्येचे केलेले प्रत्यक्ष सर्वेक्षण व त्यानुसार देय अनुदानातून प्रत्येक पंचायत समित्यांना निधीचे वितरण करण्यात आले.

यावेळी अकोला तालुक्‍यात सर्वाधिक 414 दलित वस्त्या असल्यामुळे या तालुक्‍याला 14 कोटी 35 लाख 57 हजार 256 रुपये दलित वस्त्यांच्या विकासासाठी देण्यात आले. सर्वात कमी 4 कोटी 43 लाख 11 हजार 786 रुपयांचा निधी बार्शीटाकळी तालुक्‍याला देण्यात आला. सभेत सभापती आकाश सिरसाट, सदस्य गजानन दाते, प्रशांत अढावू, संदीप सरदार, कोमल पेढे, माया नाईक, नीता गवई, आम्रपाली खंडारे, वंदना झळके, प्रकाश वाहुरवाघ, दीपमाला दामधर, सचिव आर.एस. वसतकार व इतर उपस्थित होते. 

असे केले निधीचे नियोजन 
अकोला तालुक्‍यात दलित वस्त्या 414 असल्याने 14 कोटी 35 लाख 57 हजार 256 रुपयांचा निधी या तालुक्‍यासाठी देण्यात आले. अकोटला 5 कोटी 44 लाख 45 हजार 838, बाळापूर 8 कोटी 49 लाख 93 हजार 151, बार्शीटाकळी 4 कोटी 43 लाख 11 हाजर 786, मूर्तिाजापूर 7 कोटी 45 लाख 62 हजार 799, पातूर 4 कोटी 69 लाख 53 हजार 44, तेल्हारा 5 कोटी 85 लाख 55 हजार 127 रुपयांचा निधी देण्यात आला. 

सभेत या विषयांवर झाली चर्चा 
- समाज कल्याणच्या सभेत सेस फंडातून राबवायच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. 
- रिक्त पद भरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याचा ठराव घेण्यात आला. 
- लेखा विषयक नोंदवह्यांना सभेत मंजुरी देण्यात आली.