अकोला : अवैध 'वाळू उपसा' करणाऱ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Police Action against illegal sand dealer

अकोला : अवैध 'वाळू उपसा' करणाऱ्यांवर कारवाई

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील पूर्णा नदिपात्रातील हाता वाळू घाटातून अवैध वाळूचा उपसा व वाळूची वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टर वाहनांना नदीपात्रात पकडून वाहनावर कारवाई केली. ही कारवाई महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी पहाटे केली.

तेल्हारा तालुक्यातील लिलाव झालेल्या वाळू घाटाच्या राॅयल्टीवर पूर्णा नदीपात्रातील लिलाव न झालेल्या वाळू घाटातून सर्रास वाळू चोरी सुरू होती. याबाबत स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार सैय्यद एहसानोद्दीन यांनी सतर्क नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडण्याकरिता महसूल विभागाच्या पथकाला तत्काळ घटनास्थळी पाठविण्यात आले.

उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकारही पोलिस ताफ्यासह नदीपात्रात दाखल झाले. नदीपात्रात सात ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करून वाळूची वाहतूक करताना आढळून आले. सातही ट्रॅक्टरांना उरळ पोलिस स्टेशनला जमा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पूर्णा व मन नदीपात्रातील लिलाव न झालेल्या घाटातून सर्रास वाळूची चोरी सुरू असून, महसूल व पोलिस विभागाने या घाटातील वाळू चोरावरही संयुक्त कारवाईची मागणी होत आहे. हाता येथील धडक कारवाईमुळे वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. या संयुक्त कारवाईत तलाठी म्हस्के, कांताराम तांबडे, श्री. हरीहर, एएसआय बचे, श्री. सपकाळ, श्री बाभुळकर उपस्थित होते.

Web Title: Akola Police Action Against Illegal Sand Dealer Seven Tractor Vehicles

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top