Akola News : चान्नीच्या ठाणेदारावर शेतकऱ्याला मारहाणीचा आरोप! पीडित व्यक्तीच्या पत्नीची गृहमंत्र्यांकडे तक्रार

पीडिताच्या पत्नीची गृहमंत्र्यांकडे तक्रार; जखमी शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार
akola crime channi police beat farmer
akola crime channi police beat farmersakal

पातूर (जि.अकोला) : पातूर तालुक्यात चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा येथील सुभाष इंगळे या शेतकऱ्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून ठाणेदाराने मारहाण केल्याची तक्रार पीडित शेतकऱ्याच्या पत्नीने गृहमंत्र्यांकडे केली आहे. शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपळखुटा येथील मंगला सुभाष इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रशांत शेषराव वानखडे व मिलींद शेषराव वानखडे, भाऊराव बळीराम वानखडे यांनी ता. २५ ऑगस्ट रोजी रात्री पिंपळखुटा येथे रात्री घरी येऊन त्यांना ओढताण केली व अश्लिल शिविगाळ केली.

याबाबत ठाणेदार विपुल पाटील यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांनी स्वीकारली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीत त्यांनी पतीला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून ठाणेदाराने मारहाण केल्याचेही नमुद आहे.

akola crime channi police beat farmer
Akola: एका मिनिटात १२१ हुला हूप स्पिनचा (घेर नृत्य) बनविला विश्‍वविक्रम

शेतीच्या वादातून सुभाष बळीराम इंगळे यांना ताबडतोब पोलिस स्टेशन चान्नी येथे पाठविण्याबाबतचा निरोप दीपक टिकार यांनी पोलिस पाटलांच्या जवळ दिला. त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा श्रीराम सुभाष इंगळे,

गणेश वासुदेव इंगळे व शेतकरी सुभाष इंगळे हे सर्व जण चान्नी येथे गेले. तेथे किरण सरदार नामक पातुर येथील वकील आले व त्यांनी विपुल पाटील यांना सांगितले व त्यानंतर विपुल पाटील व सरदार वकील यांनी सुभाष यांना एका खोलीत नेले व मुलाला व पुतण्याला हाकलून दिले.

akola crime channi police beat farmer
Akola Latest News : प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात स्थानिक पुढारी पाहुणे; बावनकुळेंच्या दौऱ्याचा डोलारा पेलला राजू पाटील राजेंनीच

त्यानंतर विपुल पाटील यांनी पतीला वकिलांसमोरच मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद आहे. त्यानंतर रात्री ११.३० वा. च्या दरम्यान मिलींद शेषराव वानखडे, भाऊराव बळीराम वानखडे हे तक्रारदाराच्या घरी आले व भाऊराव बळीराम वानखडे यांनी तक्रारदाराचा हात ओढला व मिलींद यानेही विनयभंग केला.

आरडाओरड केली तर मिलींद याने लज्जास्पेद कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर शिविगाळ केली व पाटील साहेबांकडून आता तुझ्या नवऱ्याला फक्त जखमी केले आता जिवाने मारून टाकील अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार पोलिस स्टेशन चान्नी येथे गेली असता रस्त्यात त्यांना प्रशांत शेषराव वानखडे व त्याची पत्नी या दोघांनी अडविले व तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी केली. पाटील साहेबांना एक लाख रुपये दिले आहे, ते तुझी तक्रारही स्वीकारणार नाही, असे सांगितल्याचे तक्रारत म्हटले आहे.

akola crime channi police beat farmer
Akola News: पावसाचे तीन महिने उलटूनही जिल्ह्यात पावसाची तुट कायम

त्यानंतर तक्रारदार पोलिस स्टेशन येथे गेली असता त्यांना हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी सुभाष यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही तक्रार गृहमंत्र्यांसोबतच पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षकांनाही देण्यात आली आहे.

विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली दखल

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी सोमवारी या प्रकरणाची दखल घेवून शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबत चान्नी पोलिस स्टेशनच्या ठाणेदारासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठाणेदार विपुल पाटील यांनी शेतकऱ्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून पैशाची मागणी केली व तुझ्या विरुद्ध तक्रार असल्याचे सांगितले. शेतकऱ्याला अर्धनग्न करून मारहाण केली व खोटे गुन्हे  दाखल  केल्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

शेतीच्या वादातून तक्रार

सुभाष इंगळे यांचे पिंपळखुटा येते शेत आहे. त्यांचे शेत दिवांग शेतकरी प्रशांत शेषराव वानखडे (३३) यांचा शेताला लागून आहे. याच शेतीवरून वाद झाला व जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची तक्रार वानखडे यांनी चान्नी पोलिस स्टेशनला ता. २५ ऑगस्ट रोजी दिली होती.

त्यावरून पोलिसांनी सुभाष इंगळे यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, २९४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक १९९८ कलम ३ (२)(व्हीए) व दिव्यांग व्यक्ती अधिकारी अधिनियम २०१६ चे कलम ९२(बी), ९२ (एफ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित शेतकऱ्यावर ता. २५ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाले तेव्हापासून आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. माझ्यावर कोणी काहीही आरोप घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. मी कायद्याची बाजू घेऊनच काम करत आहे.

- विपुल पाटील, ठाणेदार पोलिस स्टेशन, चान्नी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com