Akola News: अवैध सावकारी प्रकरणात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
Maharashtra Crime: अकोल्यातील जय हिंद चौकातील मनोज वानखडे यांच्यावर अवैध सावकारी प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी धाड टाकून महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले.
अकोला : अवैध सावकारी बाबतच्या तक्रारीनुसार मनोज वानखडे, रा. जयहिंद चौक, ता. जि. अकोला यांचेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये धाड कार्यवाही दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आली होती.