Helmet Awareness : ‘दादा, हेल्मेट वापरा हो’! घरी तुमची कुणीतरी वाट पाहतेय; अकोला पोलिसांचे आवाहन
Akola Police : अकोला शहरात सोमवारी हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी मोटारसायकल रॅली आयोजित केली. "दादा, हेल्मेट वापरा हो, घरी तुमची कुणीतरी वाट पाहतेय" हे भावनिक आवाहन केले.
अकोला : सार्वजनिक सुरक्षितता व प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्देशाने सोमवारी संपूर्ण शहरामधून हेल्मेट जनजागृतीसाठी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक सुनिल किनगे यांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.