

Akola police successfully rescue a missing 14-year-old after a 21-day extensive search operation across multiple districts.
Sakal
अकोला : २१ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचा यशस्वी शोध घेऊन त्याला सुखरूपपणे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे. या उल्लेखनीय कार्यासाठी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विशेष पथकासाठी १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ७ वाजता खदान पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी गोदाम परिसरात राहणारा ऋषीकेश संतोष कलोजीया (वय १४) अचानक घराबाहेर निघून गेला. पालकांनी शोधाशोध करूनही तो न सापडल्याने, १२ नोव्हेंबर रोजी खदान पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. मात्र मुलाकडे मोबाईल नसणे, संशयित व्यक्तींचा अभाव आणि कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने तपास कठीण झाला. या प्रकरणाची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपमधून पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचली.