esakal | अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र ठरले सर्वोत्कष्ट,  होम मिनिस्टरर ट्रॉफी’चे पहिले मानकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Police News Akola Police Training Center named Best, First Minister of Home Minister Trophy

केंद्र शासनाने पोलिस प्रशिक्षण केंद्रांच्या कामगिरीच्या आधारावर उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१६-१७ पासून हे पुरस्कार दिले जाणार आहे.

अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र ठरले सर्वोत्कष्ट,  होम मिनिस्टरर ट्रॉफी’चे पहिले मानकरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राला केंद्र शासनाची ‘होम मिनिस्ट ट्राफी’ मिळाली आहे. अकोला पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही कामगिरी अकोला केंद्राने २०६-१७ मध्ये केली आहे.

विशेष म्हणजे याच वर्षापासून पुरस्कार देणे सुरू केले असून, त्याची घोषण ९ फेब्रुवारी २०२१ रोजी भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे करण्यात आली.

हेही वाचा - भाजपचे आमदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेने केला ‘गेम’


केंद्र शासनाने पोलिस प्रशिक्षण केंद्रांच्या कामगिरीच्या आधारावर उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१६-१७ पासून हे पुरस्कार दिले जाणार आहे. त्यात पहिल्यात वर्षी भारत सरकारचा मानाचा पुरस्कार अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्राला मिळाला आहे. पश्चिम विभागातून सर्वोत्कृष्ट पोलिस प्रशिक्षण केंद्र म्हणून अकोल्याची निवड झाली आहे. या पुरस्काराच्या स्वरुपात पोलिस प्रशिक्षण केंद्राला दोन लाखांचे बक्षिस जाहीर झाले आहे. या पुरस्कारामुळे अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रचा नावलौकीक उंचावला असून, सर्व स्तरातून पोलिस प्रशिक्षण केंद्रावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा - आरक्षण निघाले; उमेदवारच नाही! आता काय करणार?

सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट
पोलिस प्रशिक्षण केंद्रामधील क्षमता, पायाभुत सुविधा, कवायत मैदान, प्रशिक्षणाचे प्रकार, उत्कृष्ट आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षण, प्रशिक्षणार्थी यांना शिकविण्याची पध्दत, उत्कृष्ट शिकवणी वर्ग, कॉन्फरन्स हॉल, लायब्ररी, सुसज्ज अशी संगणक लॅब, वेपन हॅन्डलींग, कमांडो, गोळीबार सराव, प्रशिक्षणार्थी यांची वर्तणूक व शिस्त तसेच प्रशिक्षण केंद्रातील ईमारती व कॅम्पस प्रशिक्षणार्थी यांची राहण्याची व्यवस्था, मेस व्यवस्था, कॅन्टीन, प्रशिक्षणार्थी यांचेकरिता आरोग्य विषयक पायाभुत सुविधा, अधिकारी, अंमलदारांकरिताचे निवासस्थान, मनोरंजन केंद्र, क्रीडा संकुल, अत्याधुनिक व्यायामशाळा, बालोद्यान, सौरऊर्जा बंब प्रकल्प, जल निस्सारण केंद्र, जल पुर्नभरण तलाव, गांढूळ खत प्रकल्प, नर्सरी, परीसरातील वृक्षारोपन व सुशोभिकरण इ. बाबीचा सर्वकश निरीक्षण करून सन २०१६-१७ चा भारतातील उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रांचा पुरस्कार अकोल्याला जाहीर करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)