Akola News : ८ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; हरवलेला लेक सापडला, वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
Missing Child : अकोला पोलीस स्टेशन खदानने ८ वर्षांनंतर बेपत्ता मुलगा जय सुधाकर बोदडेचा शोध घेतला आणि सुरक्षितपणे वडिलांच्या ताब्यात दिला. हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर बुशहर येथून मुलगा सापडला. पोलीस प्रशासनाच्या ऑपरेशन मुस्कानअंतर्गत ही यशस्वी कारवाई झाली, ज्यासाठी कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.
अकोला : पोलीस स्टेशन खदान, अकोला येथे दाखल असलेल्या बेपत्ता मुलाचा तब्बल ८ वर्षांनंतर शोध घेऊन त्यास वडिलांच्या ताब्यात देण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. लेक सापडल्याने वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू झळकत होते.