esakal | अकोल्यात आता वाजणार ‘११२’ ची रिंग!
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

अकोल्यात आता वाजणार ‘११२’ ची रिंग!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात आता तुम्ही कुठेही आपातकालीन परिस्थितीत अडकल्यास काळजी करण्याची गरज नाही. पोलिस तुमच्या मदतीला काही धावून येतील. त्यासाठी तुम्हाला फक्त डायल करावा लागेल ‘११२’ हा आपातकालीन नंबर. राज्यातील काही निवड जिल्ह्यातील यशस्वी प्रयोगानंतर आता अकोल्यातही गुरुवार, ता. १६ सप्टेंबरपासून पोलिसांचा आपातकालीन टोल फ्री क्रमांक नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे.

नागरीकांना आपातकालीन परीस्थितीमध्ये पोलिस सेवा एकाच टोल फ्री क्रमांकावर त्वरीत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात सरकारने ‘डायल ११२’ प्रकल्प सुरू केला आहे. अकोला जिल्हा पोलिस दलात हा प्रकल्प नागरीकांच्या सेवेसाठी गुरुवारपासुन कार्यान्वित होत आहे. डायल ११२ करीता स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रना सुपरवाइजर व डिस्पॅच्यर युनिस्ट् स्थापित करण्यात आले. प्रशिक्षीत पोलिस अधिकारी व अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

डायल ११२ प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक यंत्रणा असलेली ३१ चार चाकी वाहने, ३० दुचाकी वाहने प्रथम प्रतिसादक म्हणून प्रत्येक पोलिस स्टेशनला पुरविण्यात आले आहे. नागरीकाकडून नियंत्रण कक्षात टोल फ्री क्रमांक डायल ११२ व्दारे घटनेबाबत प्राप्त झाल्यानंतर तत्काळ मदत पोहचून कार्यवाही करण्यासाठी यापैकी घटनेच्या जवळ असलेले वाहन व त्यावर नेमणुकीस असलेले पोलिस पथक त्याठिकांनी पोहचून पुढील मदत व कार्यवाही करणार आहे. त्याकरिता ३०० पोलिस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या सेवेचा उपयोग घेण्याचे आवाहन सर्व नागरीकांना केले आहे. कोणत्याही प्रकारची आपतकालीन परिस्थिती उदभवल्यास पोलिसांच्या मदतीची गरज असल्यास नागरीकांनी डायल ११२ या टोल फी क्रमांकावर संपर्क साधावा व खरी माहिती पोलिसांना द्यावी. जणेकरून मदतीची गरज असलेल्या ठिकांनी पोलिसांना तात्काळ सेवा देणे शक्य होईल, असे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले.

आधुनिक वाहने सज्ज

डायल ११२ हा प्रकल्प अकोला पोलिस दलात राबिण्यासाठी सर्व आधुनिक यंत्रणा असलेली ३१ वाहने सुसज्ज झाली आहेत. आपातकालीन प्रतिसाद वाहनांमध्ये मोबाईल डेटा टर्मिनल जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईसेस बसविण्यात ली आहेत. हीय यंत्रणा असलेल्या ३० दुचाकीही नागरिकांच्या सेवेत राहणार आहेत.

loading image
go to top