

Akola Police Launches ‘Akola CopConnect’ WhatsApp Chatbot
Sakal
अकोला : नागरिक–पोलीस संवाद अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आज महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन २०२६ या औचित्यावर ‘अकोला कॉप कनेक्ट’ या व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवेला सुरुवात केली. या सेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते झाला. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मनपा आयुक्त सुनील लहाने, डीएफओ सुमन सोळंके, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलीस अधीक्षक (गुन्हे) ईशानी आनंद यांसह मान्यवर उपस्थित होते.