esakal | पशुधन विकास मंडळ कार्यालयाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

बोलून बातमी शोधा

Akola Political News Livestock Development Board office dispute in the Chief Ministers court}

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती येथे सूचना दिल्यानंतरही अकोल्यातील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर स्थलांतरीत करण्याच्या उद्देशाने रात्रीतून साहित्य पोलिस बंदोबस्तात हलविण्यात आले. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा मुद्दा पोहोचविला आहे.

पशुधन विकास मंडळ कार्यालयाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती येथे सूचना दिल्यानंतरही अकोल्यातील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय नागपूर स्थलांतरीत करण्याच्या उद्देशाने रात्रीतून साहित्य पोलिस बंदोबस्तात हलविण्यात आले. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात हा मुद्दा पोहोचविला आहे.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम


संकरीत गो पैदाशीचा कार्यक्रम राबविताना राज्याच्या काही भागात दुधाच्या उत्पादनात व संकरीत जनावरांच्या संख्येत लक्षनिय वाढ झाली. मात्र विदर्भ, कोकण व मराठवाडा विभाग या संदर्भात अविकसित राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांना कृत्रिम रेतनात स्वावलंबी बनविण्यासाठी व दुग्धव्यवसायामध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथे स्थापन करण्यात आले होते.

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

हे कार्यालय स्थलांतरीत करण्याचा आदेस ५ फेब्रुवारीला धडकला आणि ७ फेब्रुवारीला कार्यालयातील साहित्य नागपूरला हलविण्यास सुरुवात झाली. त्याला भाजप व प्रहारने विरोध केल्यानंतर सोमवारी रात्री पोलिस बंदोबस्तात कार्यालयातील महत्त्वाचे साहित्य नागपूरला पाठविण्यात आले. हीबाब पालकमंत्री बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र देवून कार्यलय स्थलांतरणाचा आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा - पहिलाच प्रयोग; अकोल्यात साकारतेय चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाणे

तत्कालीन मंत्री डॉ. भांडे यांनी केला निषेध
पशुधन विकास मंडळ कार्यालय अकोल्यात सुरू करण्यासाठी तत्कालीन पशुसंवर्धनमंत्री डॉ. दशरतत भांडे यांनी पुढाकार घेतला होता. आता ज्याप्रकारे हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले त्याचा माजी मंत्र्यांनी निषेध केला आहे. आत्महत्याग्रस्त भागातील दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी मंडळाचे कार्यालय अकोल्यात असणे आवश्यक होते. मात्र हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आल्याने त्याला खिळ बसणार आहे. स्थानिक लोकप्रितिनिधींनी हा मुद्दा येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करून कार्यालय अकोल्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे डॉ. दशरथ भांडे यांनी बुधवार पत्रकार परिषदेत सांगितले.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)