esakal | जिल्हा बँक निवडणुकीत कोरपे गटाचे वर्चस्व!. सहकार पॅनलचे सर्व सदस्य विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Political News Santosh Korpe wins Akola District Central Cooperative Bank election

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने वर्चस्व कायम ठेवलसे. रविवारी मतमाेजणीनंतर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले. शनिवारी २१ पैकी नऊ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. यापूर्वीच १२ उमेदवार बिनविराेध निवडून आले हाेते.

जिल्हा बँक निवडणुकीत कोरपे गटाचे वर्चस्व!. सहकार पॅनलचे सर्व सदस्य विजयी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकाेला :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने वर्चस्व कायम ठेवलसे. रविवारी मतमाेजणीनंतर सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले. शनिवारी २१ पैकी नऊ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. यापूर्वीच १२ उमेदवार बिनविराेध निवडून आले हाेते.


अकोला आणि वाशीम असे दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या दी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी शनिवारी एक हजार ९६ पैकी १ हजार ६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता. मतदानाची टक्केवारी ९७.४५ हाेते. रविवारी अकोला येथे जिल्हा परिषद कर्मचारी भवनात मतमाेजणी झाली. मतमोजणीनंतर ४५ मतं अवैध ठरली. मतमाेजणी प्रक्रियेत निवडणूक निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनायकराव कहाळेकर, याेगेश लाेटे आदी सहभागी झाले हाेते.

हेही वाचा - Breaking : पुन्हा निर्बंध; मंगळवारपासून पूर्ण लॉकडाऊन


बिनविरोध सदस्यांची नावे जाहीर
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १२ उमेदवार बिनविराेध निवडून आले. त्यांच्या नावाची घाेषणा रविवारी करण्यात आली. यात सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, बार्शीटाकळीमधून दामाेदर काकड, बाळापूर- राजेश राऊत, पातूर-जगदिश पाचपाेर, मूर्तिजापूर- सुहासराव तिडके, वाशीम जिल्ह्यातील रिसाेड येथील आमदार अमित झनक व मंगरूळपीर येथील सुभाष ठाकरे हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अंबादास तेलगाेटे, इतर मागासवर्गीयमधून डाॅ. सुभाष काेरपे, भटक्या जाती-विमुक्त व विशेष मागासवर्गीयमधून रामसिंग जाधव, कृषी पणन, शेतीमाल प्रक्रियेतून शिरीष धाेत्रे, औद्याेगिक, मजूर, विणकर, वैयक्तिक भागधारक मतदारसंघातून वामनराव किसनराव देशमुख हे बिविरोध निवडून आले.

हेही वाचा -अखेर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

यांना मिळविला विजय
अकाेला तालुकायातून रमेश हिंगणकर हे ४२ मते घेऊन विजयी झाले. प्रतीस्पर्धी विनाेद मंगळे यांना १५ मते मिळाली. तेल्हारा येथून रुपाली खाराेडे यांनी २४ मते प्रात करीत ११ मत पडलेले नारायण माेहाेड यांच्याविरुद्ध विजय मिळविला. वाशीममध्ये महादेव काकडे यांनी ५९ मत मिळवून भागवत काेल्हे यांचा पराभव केला. कोल्हे यांना ३३ मते मिळाली. मालेगावमधून दिलीप जाधव यांनी ४४ मते प्राप्त करीत प्रकाश कुटे यांच्याविरुद्ध अवघ्या चार मतांनी विजय मिळविला. मानाेरा येथून उमेश ठाकरे यांना १६ , तुषार इंगोले १२, तर सुरेश गावंडे यांना सहा मते मिळाली. ठाकरे चार मतांनी विजयी झाले. कारंजामधून श्रीधरराव कानकिरड यांनी ३९ मतं प्राप्त केली. त्यांचे प्रतिस्पर्धी विजय काळे यांना २३ मतं मिळाल्याने कानकिरड यांचा विजय झाला.

हेही वाचा -कुणी चोरली ग्रामीण रुग्णालयातील कोरोनाची लस?

महिलांमध्ये गावंडे, चौधरी विजयी
महिला प्रतिनिधी मतदारसंघाच्या दाेन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान संचालक भारती गावंडे यांना ९१३, मंदा चाैधरी यांना ९२२ मतं प्राप्त करीत विजय मिळविला. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदाचे संचालक वामनराव विनायकराव देशमुख यांच्या पत्नी छाया देशमुख यांना १४९ मतं मिळाली.

हेही वाचा -

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा विजय
पगारदार नाेकरांच्या पत संस्था व इतर सभासद मतदारसंघातून काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी १४० मते मिळवून विजय प्राप्त केला. वाशीम येथील महानंदाचे संचालक वामनराव विनायकराव देशमुख यांना ७० मतं मिळाली.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात  संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!