Akola Politics : भाजपकडून 'एका दगडात दोन पक्षी मारण्याचा' प्रयत्न

अकोला जिल्ह्यातील एकाच विधानसभा मतदारसंघातील दोघांची ओबीसी प्रदेश कार्यकारणीत वर्णी
akola
akolasakal

अकोला: भाजपच्या ओबीसी कार्यकारणीत अकोला जिल्ह्यातील एकाच विधानसभा मतदारसंघातून दोन नेत्यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही नेते एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याने त्यांना उपाध्यक्षपद देऊन पक्षाने 'एका दगडात दोन पक्षी मारण्याचा' प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या ओबीसी आघाडीची कार्यकारणी जाहीर केली आहे. या कार्यकारणी अकोला जिल्ह्यातून तीन नेत्यांची वर्णी लागली आहे. त्यापैकी बाळापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले नारायणराव गव्हाणकर व बळीराम सिरस्कार या दोन प्रतिस्पर्धी नेत्यांना उपाध्यक्ष पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

याशिवाय भाजपच्या प्रस्थापित खासदार धोत्रे गटाचे विरोधक समजले जाणारे व माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. अशोक ओळंबे यांना सचिवपद देण्यात आले आहे. या तीन नेत्यांपैकी नारायणराव गव्हाणकर व डॉ.अशोक ओळंबे यांची नावे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चर्चेत होती. या दोन्ही नेत्यांना प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती देऊन भाजपने त्यांच्या आगामी लोकसभा निवडणुकीतील तिकिटाचा मार्ग रोखला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

akola
Akola News : नुकसानीच्या सहा महिन्यांनंतर अकोला जिल्ह्यात मदत जाहीर

माजी आमदार बळीराम सिरस्कार हे नुकतेच भाजपमध्ये आले असून, त्यांना थेट राज्य कार्यकारिणीवर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असून, या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी केल्या असल्याचे समजते. याशिवाय माजी आमदार गव्हाणकर यांचा मुलगा वंचित बहुजन आघाडी कडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेला असल्याने त्यांच्या बाबतही प्रदेश स्तरावर तक्रारी करण्यात आल्याची माहिती आहे. मराठा समाजातील नेते डॉ. अशोक ओळंबे यांना ओबीसी कार्यकारणीत स्थान देण्यात आल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

akola
Akola : वान प्रकल्पाचे दोन वक्रद्वार उघडले

मतदारसंघात दोन माजी आमदार आमने-सामने

अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपसाठी नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. या मतदारसंघातून नेमके कोणाला विधानसभेच्या निवडणुकीत उतरवायचे यासंदर्भात कधीही शेवटपर्यंत अंतिम निर्णय होऊ शकलेला नव्हता. आताही या मतदारसंघातून दोन माजी आमदारांना भाजपने आमने-सामने उभे करून अंतर्गत संघर्षाला संधी दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

akola
Akola News : हमालांची थकीत रक्कम देण्यासाठी स्वीकारली लाच, तेल्हारा बाजार समिती उपसभापतीला अटक

अकोला पश्चिमच्या दावेदावरही कुऱ्हाड

अकोला जिल्ह्यातील भाजपच्या ज्या मतदार संघांना गड समजले जाते, त्यापैकी एक अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आतापर्यंत सहा वेळा निवडून आलेले आमदार गोवर्धन शर्मा हे आजारी असल्याने आगामी निवडणूक ते लढवणार नाहीत हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपला त्यांचा वारसदार शोधावा लागणार आहे. यासाठी भाजपमधून अनेक दिग्गज इच्छुक असून, त्यापैकी एक डॉक्टर अशोक ओळंबे हे आहेत. मात्र, त्यांची वर्णी ओबीसी आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीवर लावून भाजपने त्यांनाही स्पर्धेतून बाजूला केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com