Akola: मालमत्ता कर ऑनलाईन भरणे आता अधिक सोपे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

property tax

अकोला : मालमत्ता कर ऑनलाईन भरणे आता अधिक सोपे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी आता मालमत्‍ता कराचा भरणा करणे अधिक सोईचे झाले आहे. वसुली लिपीक ‘स्मार्ट’ झाले असून, नागरिकांना आता रोख रकमेसोबतच एटीएम डेबिट, क्रेडिट कार्डने मालमत्ता कराचा भरणा करता येणार आहे.

मनपा आयुक्‍त कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगालिका अंतर्गत ४८ कर वसुली लिपींकांना स्‍मार्ट मोबाईल पेमेंट टर्मीनल (एस.एम.पी.टी.) देण्‍यात आली आहे. यापूर्वी मनपा कर वसुली लिपिकांव्‍दारे मालमत्‍ताधारकांकडून फक्‍त रोख रक्कम व चेक भरणा स्वीकारण्‍यात येत होत्‍या.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

आता मालमत्‍ताधारकांना कर भरण्‍यासाठी या मशीन व्‍दारे रोख रक्कमेसह, चेक, डी.डी., कार्ड स्‍वॅपींग व्‍दारे, व ऑनलाईन पेमेंट व्हॉलेटव्‍दारे तसेच क्‍यू.आर.कोड व्‍दारे पेमेंट (कराचा भरणा) करता येणार आहे. यापैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करून मालमत्ता कराचा भरणा केल्यानंतर मालमत्ताधारकाला कर भरणा केल्याची पावतीही जागेवर दिली जाणार आहे. या पद्धतीमुळे मालमत्ता कराची वसुली अधिक गतीने होण्यास मदत होईल. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीचा टक्काही वाढण्यास मदत होणार आहे.

मनपाने केले कर भरणा करण्याचा आवाहन

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना थकित मालमत्‍ता कर भरणे सोईचे व्‍हावे याकरीता शेवटची संधी म्‍हणून ता. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत शास्‍ती अभय योजना राबविली जात आहे. त्यापूर्वी कर भरणा करण्याचे आवाहन आयुक्‍त कविता व्दिवेदी यांनी केले आहे.

loading image
go to top