अकोला : विद्यार्थ्यांचा पदवी अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न सुटला

भाजयुमोच्या आंदोलनाला यश
अकोला : विद्यार्थ्यांचा पदवी अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न सुटला
अकोला : विद्यार्थ्यांचा पदवी अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न सुटलाsakal
Updated on

अकोला : राज्यातील सहा हजार ४२० कृषी पदविकेच्या विद्यार्थ्यांना कृषी पदविकेच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार आहे. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी तंत्र निकेतनच्या अकराशे ६८ विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

कृषी तंत्र निकेतन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बी.एस.सी कृषी या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जायचा; पण मागील वर्षी या पद्धतीने दिल्या जाणाऱ्या प्रवेशाला विद्यापीठाने नकार दिल्याने विदर्भातील एक हजार १६८ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने कृषी विद्यापीठात आंदोलन केल होत.

अकोला : विद्यार्थ्यांचा पदवी अभ्यासक्रम प्रवेशाचा प्रश्न सुटला
नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री मराठवाड्याचा दौरा करणार

आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी सक्रिय सहभाग घेऊन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना विद्यार्थ्यांची समस्या सांगून राज्य शासनाकडे तसा अहवाल पाठवून विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगितल्या. ता.१६ जून २०१६ रोजी असा निर्णय घेतला होता. याविरोधात जुलैमध्ये आंदोलन करून कृषी प्रधान देशात व महाराष्ट्रात असा प्रकार निंदनीय आहे, अशी भूमिका व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत देण्याची मागणी त्यांनी केली होती.

आंदोलनाची घेतली दखल

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषी सचिव, कृषी संचालक, कृषी विद्यापीठात हा प्रश्न उपस्थित केला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, अनिल बोंडे, विक्रांत पाटील यांनी सुद्धा या प्रश्नाला चालना दिली. भाजयुमोचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांनी हा प्रश्न उघडीस आणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केले. हा पाठपुरावा व भाजयुमोच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने आदेश काढून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com