

Akola
esakal
अकोला: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अकोला रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेच्या जमिनीवरील मोठ्या अतिक्रमणाविरोधात यशस्वी मोहीम राबवत तब्बल १० हजार चौरस मीटर जागा अतिक्रमणमुक्त केली आहे. सुमारे १० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या या जागेवरील २० वर्षांपासून अस्तित्वात असलेली ३५ तात्पुरती व कायमस्वरूपी बांधकामे हटविण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकासाच्या कामांना मोठी चालना मिळणार आहे.